Pro Kabaddi League 2021-22: पाटणा पायरेट्सने उडवला पुणेरी पलटणचा धुव्वा; रोमांचक लढतीत हरयाणाचा टायटन्सवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 10:57 PM2021-12-28T22:57:04+5:302021-12-28T22:58:48+5:30

पाटणा संघाने तगड्या विजयासह गुणतालिकेत आठव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर उडी घेतली.

Pro Kabaddi League 2021-22 Live Updates Patna smash Puneri Paltan Haryana beat Telugu Thriller match | Pro Kabaddi League 2021-22: पाटणा पायरेट्सने उडवला पुणेरी पलटणचा धुव्वा; रोमांचक लढतीत हरयाणाचा टायटन्सवर विजय

Pro Kabaddi League 2021-22: पाटणा पायरेट्सने उडवला पुणेरी पलटणचा धुव्वा; रोमांचक लढतीत हरयाणाचा टायटन्सवर विजय

googlenewsNext

Pro Kabaddi League 2021-22 Live Updates: प्रो कबड्डीच्या आजच्या दोन सामन्यांमध्ये पाटणा पायरेट्स आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघांनी विजय मिळवला. पाटणा पायरेट्सने पहिल्या सामन्यात पुण्याला चांगलीच मात दिली. ३८-२६ अशा मोठ्या फरकाने पुणेरी पलटणचा धुव्वा उडाला. तर दुसऱ्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सने तेलुगू टायटन्सला दोन गुणांच्या फरकाने पराभूत केले.

पाटणा पायरेट्सचा मोठा विजय (३८-२६)

पाटणा संघ एका विजयासह मैदानात उतरला होता. तर पुणेरी पलटणही दुसऱ्या विजयाच्या शोधात होते. पण सामना सुरू झाल्यापासून सामना पाटणा संघाकडेच झुकताना दिसला. पाटणा संघाने चढाई आणि बचाव दोन्हीचे उत्तम संतुलन राखत आक्रमक खेळ केला. पाटणाने १६ रेड पॉईंट्स आणि १३ टॅकल पॉईंट्स मिळवले. पुण्यानेही १४ रेड आणि १० टॅकल पॉईंट्स कमावले होते. पण पाटणाला ऑल आऊटचे ४ आणि अतिरिक्त ५ पॉईंट्स मिळाल्याने ते मोठ्या फरकाने वरचढ ठरले. पाटणाकडून सचिनने १० रेड पॉईंट्स मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली.

हरयाणाचा तेलुगू टायटन्सवर थरारक विजय (३९-३७)

हंगामात आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी न केलेल्या दोन संघामध्ये आज दमदार लढत रंगली. हाफ टाईमपर्यंत अत्यंत चुरशीचा असलेला सामना शेवटपर्यंत अटीतटीचा झाला पण अखेर दोन गुणांच्या फरकाने हरयाणाने तेलुगू टायटन्सला मात दिली. हरयाणाकडून मीतू महेंद्रने १२ रेड पॉईंट्स मिळवले. 'तेलुगू'च्या सिद्धार्थ देसाईने ९ गुण मिळवले पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

Web Title: Pro Kabaddi League 2021-22 Live Updates Patna smash Puneri Paltan Haryana beat Telugu Thriller match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.