शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

Pro Kabaddi League 2018 : शेतकऱ्याचा मुलगा झाला यू-मुम्बाचा शिलेदार; आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न साकारणार!

By स्वदेश घाणेकर | Published: October 13, 2018 7:55 AM

Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते...

स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात असाच एक निर्धाराने पक्का असलेला शेतकऱ्याचा मुलगा सर्वांचे लक्ष वेधत आहे. अनुप कुमारच्या नसण्याने यू मुंबा संघात निर्माण झालेली पोकळी महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई भरून काढत आहे. लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थने दोन सामन्यांत 28 गुणांची कमाई केली आहे. कामगिरीत सातत्य राखून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा त्याचा निर्धार आहे.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरच्या सिद्धार्थला यू मुंबाने आपल्या चमूत दाखल करून घेतले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सिद्धार्थने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. यू मुंबाने 34 लाखांची बोली लावत सिद्धार्थला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आणि कामगिरीच्या जोरावर त्याने आपली निवड सार्थ ठरवली. तो म्हणाला,'' आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव गाठीशी असलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद वाटत आहे. या संधीचं सोनं करताना भारताच्या संघात स्थान पटकावण्याचा प्रयत्न असेल.''

आई-वडील, एक भाऊ अशा छोट्याश्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थने स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. वडील शेतकरी आणि आई गृहीणी, त्यामुळे आर्थिक चणचण ही भासायची, परंतु त्याची सबब पुढे न करता सिद्धार्थ स्वप्नांच्या दिशेने चालत राहिला. सातव्या वर्षांपासून त्याने गावातच कबड्डीचे धडे गिरवले. पण, त्याला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज होती. 'फिजिक्स बीएससी' चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुण्यातील सत्तेज बाणेर क्लबकडून खेळू लागला आणि तिथून त्याच्या व्यावसायिक कबड्डीला सुरूवात झाली. 

दोन वर्षांनंतर त्याला एअर इंडियावर काँट्रॅक्टवर नोकरी मिळाली. येथेच त्याची कबड्डी बहरली. तो म्हणाला,''एअर इंडियाकडून खेळताना माझ्या खेळात बरीच सुधारणा झाली. या क्लबकडून खेळताना अनुभवी खेळाडूंकडून बरेच काही शिकायला मिळाले. प्रशिक्षक अशोक शिंदे यांची मला खूप मदत झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळात बरीच सुधारणा झाली. दोन वर्ष मी एअर इंडियाकडून खेळत आहे.''

प्रो कबड्डीच्या लिलावातून मिळालेल्या रकमेचं काय करणार या प्रश्नावर तो सुरुवातीला हसला आणि म्हणाला,''खूप काही करायचं आहे. घर घ्यायचं आहे, आई-वडिलांसाठी भावासाठी खूप काही घ्यायचं आहे. कारण, उभ्या आयुष्यात इतकी रक्कम मी कधी पाहिली नव्हती. पण, सर्वप्रथम मला माझ्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे. ती म्हणजे फोर व्हीलर घेण्याची. त्यामुळे या पैशांनी प्रथम फोर व्हीलर खरेदी करून आईला त्यात बसवून फेरफटका मारून आणायचे आहे.'' 

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीKabaddiकबड्डी