श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी सर जाडेजाला खूशखबर

By Admin | Updated: June 8, 2017 13:45 IST2017-06-08T13:45:03+5:302017-06-08T13:45:03+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी रवींद्र जाडेजाला खूशखबर मिळाली आहे.

Prior to the Sri Lankan match, Sir Jadeja is happy | श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी सर जाडेजाला खूशखबर

श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी सर जाडेजाला खूशखबर

ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 8 - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी रवींद्र जाडेजाला आनंदाची बातमी  मिळाली आहे. भारतीय संघातील हा अष्टपैलू खेळाडू बाबा झाला आहे. जाडेजाची पत्नी रिवाने राजकोटमधील रुग्णालयात गोडंस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मामुळे जाडेजा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई आणि बाळ सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

खरंतर पत्नीच्या प्रेग्नंसीदरम्यान आणि बाळाच्या जन्मावेळी रवींद्र जाडेला रिवासोत राहायचं होतं. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी जाडेजा इंग्लंडमध्ये आहे. इंगिलंडमध्ये जाडेजाला ही खूशखबर मिळाल्यानंतर संघातील सहकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.  

17 एप्रिल, 2016 रोजी राजकोटमध्ये रवींद्र जाडेजा आणि रिवा सोळंकी लग्नबंधनांत अडकले होते.

 

 

Web Title: Prior to the Sri Lankan match, Sir Jadeja is happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.