आफ्रिका मालिकेपूर्वी प्रशिक्षकाची निवड : ठाकूर
By Admin | Updated: July 29, 2015 02:32 IST2015-07-29T02:32:16+5:302015-07-29T02:32:16+5:30
आगामी सप्टेंबर महिन्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या पूर्णकालिक प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक

आफ्रिका मालिकेपूर्वी प्रशिक्षकाची निवड : ठाकूर
नवी दिल्ली : आगामी सप्टेंबर महिन्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या पूर्णकालिक प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
ठाकूर म्हणाले,‘प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी आम्ही घाई करू इच्छित नाही. पूर्णकालिक प्रशिक्षकाची निवड करताना आवश्यक तो वेळ घेणार असून पूर्ण माहितीनंतरच याबाबतच निर्णय घेण्यात येईल. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर आमच्याकडे चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ राहणार आहे. या कालावधीत प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल.’ रवी शास्त्रीबाबत बोलताना ठाकूर म्हणाले,‘श्रीलंका दौऱ्यापर्यंत शास्त्री संघासोबत
राहणार आहेत.(वृत्तसंस्था)