आॅलिम्पिकचा ‘राजकुमार’ पदपथावर

By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:35+5:302015-07-25T01:14:35+5:30

स्पेशल विंटर आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदकविजेता व बँकॉकमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्समध्ये निवड झालेला खेळाडू दिल्लीतील रस्त्यावर फॅन्सी

The 'prince of the Olympics' on the pavement | आॅलिम्पिकचा ‘राजकुमार’ पदपथावर

आॅलिम्पिकचा ‘राजकुमार’ पदपथावर

वैशाली मलेवार , नवी दिल्ली
स्पेशल विंटर आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदकविजेता व बँकॉकमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्समध्ये निवड झालेला खेळाडू दिल्लीतील रस्त्यावर फॅन्सी ज्वेलरी विकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर
आले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबांच्या भरणपोषणासह खेळासाठी पैशांची जुळवाजुळव करताना त्याला तारेवरील कसरत करावी लागत आहे.
राजकुमार असे या दिल्लीच्या २० वर्षीय युवा खेळाडूचे नाव आहे. येत्या ५ आॅगस्टपासून बँकॉक येथे होणाऱ्या एशियन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. राजकुमार दिल्लीच्या पहाडगंज या भागात दिवसभर फॅन्सी ज्वेलरी विकतो आणि रात्री गुडगावच्या एका मॉलमध्ये आईस स्केटिंगचा सराव करतो.
राजकुमारने फेब्रुवारी २०१३मध्ये दक्षिण कोरियाच्या प्योंग चांग येथे झालेल्या स्पेशल आॅलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्समध्ये आईस स्केटिंग खेळात एकेरीत सुवर्ण व दुहेरीत रौप्यपदक पटकावत भारताचे नाव झळकावले.
भारत सरकारने तेव्हा
५० हजार रुपयांचे पारितोषिकही दिले, मात्र नंतर खेळाडूला पूर्णपणे विसरून गेले. यानंतर शासनाने राजकुमारची साधी विचारपूसदेखील केलेली नाही.
राजकुमार म्हणाला, ‘मी पहाडगंज येथे एका खोलीत राहतो. माझे वडील पदपथावर सामान विकून सात लोकांचे कुटुंब पोसत आहेत. माझे भाऊ बेरोजगार असून, मी देखील जास्त शिकलेलो नाही त्यामुळे
मी वडिलांना मदत करतो.’

Web Title: The 'prince of the Olympics' on the pavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.