Prime Minister Congratulates India’s Men’s Junior Hockey Team : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ च्या एफआयएच हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या भारताच्या युवा हॉकी संघातील खेळाडूंना शाब्बासकी दिली आहे. हॉकी जगतातील प्रतिष्ठित स्पर्धा गाजवणाऱ्या संघाचे कौतुक करताना पंतप्रधान मोंदींनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
PM मोदींची युवा हॉकी संघासाठी खास पोस्ट
भारतीय संघाने दमदार कामगिरी, नऊ वर्षांचा दुष्काळ संपवत रचला इतिहास
चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या प्लेऑफ्सच्या लढतीत भारतीय संघाने अर्जेंटिनाला पराभवाचा दणका देत या स्पर्धेतील पदकी दुष्काल संपवला. दोन गोलसह पिछाडीवर असताना भारतीय संघाने अखेरच्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवत अर्जेंटिनाला ४-२ असे पराभूत करत कांस्य पदक पटकावले. २०१६ नंतर भारतीय संघाने या स्पर्धेत पदक निश्चित केले. भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत दोन कांस्यपदके (२००१ आणि २००५) जिंकली होती. २०१६ मध्ये भारताने अंतिम फेरीत बेल्जियमचा पराभव करीत जेतेपदही पटकावले होते. यंदाच्या हंगामातील कांस्य पदकासह भारताने या स्पर्धेत पाचवे पदक पटकावले आहे.
Web Summary : PM Modi congratulated India's junior hockey team for their FIH World Cup bronze win. He hailed the team's spirit and inspiring victory, marking a new era for Indian hockey after defeating Argentina 4-2 and ending a nine-year medal drought.
Web Summary : पीएम मोदी ने FIH हॉकी विश्व कप में कांस्य पदक जीतने पर भारतीय जूनियर हॉकी टीम को बधाई दी। उन्होंने टीम की भावना और प्रेरणादायक जीत की सराहना की, अर्जेंटीना को 4-2 से हराकर नौ साल का पदक सूखा खत्म किया।