शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
3
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
4
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
5
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
7
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
8
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
11
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
13
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
14
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
15
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
16
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
17
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
18
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
19
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
20
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

दडपण आमच्यावर नसून पाकवर - रोहित

By admin | Updated: February 8, 2015 01:59 IST

विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत दडपण परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर राहणार आहे, असे मत भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केले.

अ‍ॅडिलेड : विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत दडपण परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर राहणार आहे, असे मत भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केले. विश्वकप स्पर्धेत आजतागायत पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध विजय मिळविता आलेला नाही.रोहित म्हणाला, ‘‘दडपण आमच्यावर नसून त्यांच्यावर आहे. विश्वकप स्पर्धेत त्यांनी अद्याप आमच्याविरुद्ध विजय मिळविलेला नाही. आम्ही त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू.’’ पाकविरुद्धची लढत नेहमीच महत्त्वाची असते. भारतीय संघ या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक आहे. आम्ही केवळ एका लढतीवर लक्ष केंद्रित केलेले नाही. जर आम्ही सकारात्मक विचार केला, तर निकाल नक्कीच अनुकूल राहील. सर्वोत्तम कामगिरी कशी करायची, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. विश्वकप स्पर्धेतील प्रत्येक लढत महत्त्वाची असते. त्यामुळे पहिली लढत काही वेगळी आहे असे मला वाटत नाही.’’रोहित पुढे म्हणाला, ‘‘एकदा भारताची जर्सी परिधान केली की चांगल्या कामगिरीची प्रेरणा सहज मिळते.’’ रोहित प्रथमच विश्वकप स्पर्धेत खेळणार आहे. विश्वकप स्पर्धेच्या आठवणीबाबत बोलताना रोहितने १९९२च्या विश्वकप स्पर्धेतील आठवण सांगितली. तो म्हणाला, ‘‘१९९२च्या विश्वकप स्पर्धेत ब्रिस्बेनमध्ये अजय जडेजाने सूर मारत अ‍ॅलन बॉर्डरचा टिपलेला झेल आठवतो. याव्यतिरिक्त सेन्चुरियनमध्ये भारत-पाक लढतीत सचिन तेंडुलकरची सर्वोत्तम फलंदाजी बघितली. ती लढत मी कधीच विसरू शकत नाही. नाणेफेकीपासून शेवटच्या चेंडूपर्यंत दडपण होते.’’ (वृत्तसंस्था)