दडपण जोकोव्हीचवर : नदाल

By Admin | Updated: June 3, 2015 00:29 IST2015-06-03T00:29:57+5:302015-06-03T00:29:57+5:30

रोला गॅरोचा बादशाह व फ्रेंच ओपनमध्ये नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळविणार राफेल नदाल व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हीच

Prepress Jocovich: Nadal | दडपण जोकोव्हीचवर : नदाल

दडपण जोकोव्हीचवर : नदाल

पॅरिस : रोला गॅरोचा बादशाह व फ्रेंच ओपनमध्ये नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळविणार राफेल नदाल व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हीच यांच्यादरम्यान बुधवारी खेळल्या जाणारी उपांत्यपूर्व फेरीची लढत चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे, पण स्पेनिश खेळाडूच्या मते त्याच्यासाठी ही एक सामन्य लढत आहे. वर्षातील दुसरी ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा पुढे सरकत असताना रंगत अधिक वाढत आहे.
नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या नदालने बुधवारच्या लढतीबाबत दडपण नसल्याचे स्पष्ट करताना सर्व दडपण अव्वल मानांकित जोकोव्हिचवर राहणार असल्याचे म्हटले आहे. नदालने यापूर्वी रोला गॅरोवर जोकोव्हिचविरुद्ध सहावेळा विजय मिळविला आहे. स्पेनच्या या स्टार खेळाडूने फ्रेंच ओपनमध्ये विक्रमी ७० सामने जिंकले असून केवळ एक लढत गमावली आहे. जोकोव्हिचविरुद्ध नदालने गेल्या तीन वर्षांत २०१२ व २०१४ च्या अंतिम लढतींसह २०१३ च्या उपांत्य फेरीत विजय मिळवला होता. जोकोव्हिचविरुद्धच्या लढतीबाबत बोलताना नदाल म्हणाला,‘माझ्यासाठी ही एक सामन्य लढत आहे. जर ही लढत जेतेपदासाठी असती तर वेगळी बाब असती पण, ही उपांत्यपूर्व फेरीची लढत असून यात सरशी साधणाऱ्या खेळाडूला उपांत्य फेरी गाठता येईल. गेल्या वर्षी अंतिम लढतीत जोकोव्हिचचा पराभव केला होता. यंदाच्या मोसमात मी त्याच्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळत आहे. या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तरी माझ्या जीवनात विशेष फरक पडणार नाही.’
चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न बघणाऱ्या जोकोव्हिचबाबत बोलताना नदाल म्हणाला,‘माझी स्थिती जोकोव्हिचच्या तुलनेत वेगळी आहे. मला जर पराभव स्वीकारावा लागला तर मी पुढच्या स्पर्धेच्या तयारीला प्रारंभ करणार आहे, पण जोकोव्हिचने
विजय मिळवला तर तो चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावण्याच्या स्वप्नासह पुढे वाटचाल करणार आहे.’(वृत्तसंस्था)

Web Title: Prepress Jocovich: Nadal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.