महापौर मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी

By Admin | Updated: October 24, 2015 02:50 IST2015-10-24T02:50:53+5:302015-10-24T02:50:53+5:30

गेल्या काही वर्षांपासून आपल्या आयोजनाने क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधणाऱ्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनच्या तयारीसाठी वसई - विरार महानगरपालिकेची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

Preparations for the Mayor Marathon | महापौर मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी

महापौर मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून आपल्या आयोजनाने क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधणाऱ्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनच्या तयारीसाठी वसई - विरार महानगरपालिकेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आगामी २२ नोव्हेंबरला रंगणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष असून, या वेळी देशभरातील अव्वल धावपटूंनी स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केलेला असल्याने या मॅरेथॉनची उत्सुकता वाढली आहे. त्याचप्रमाणे यंदाची बक्षीस रक्कम २६ लाखांपर्यंत असून, विजेत्यांमध्ये विजेतेपद पटकावण्याची मोठी चुरस दिसेल असे आयोजकांकडून सांगितले जात आहे.
‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा व निसर्ग समतोल पाळा’ असा संदेश देण्यात येणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह राज्यातून तसेच देशभरातून धावपटू सहभागी होणार असल्याने यंदा अधिक आव्हान असेल. वसई - विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला - क्रीडा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मॅरेथॉनला २०१२ साली राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा मिळाला. यंदाच्या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा या वेळी घेण्यात येणार आहेत.
पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्याला अडीच लाख रुपयांचे पारितोषिक तर अर्ध मॅरेथॉनमधील विजेत्याला सव्वा लाख रुपयांचे पारितोषिक पटकावण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे दोन्ही गटांतील पारितोषिकांमध्ये अनुक्रमे ५० व २५ हजार रुपयांची वाढ यंदा करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी या वेळी १८ वर्षांखालील मुले (११ किमी) आणि मुली (७ किमी) अशी विशेष स्पर्धा घेण्यात येणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

पूर्ण मॅरेथॉन : निरज पाल, एलाम सिंग, नितेंदर संग रावत, प्रल्हाद सहाई मीना, गिरीश तिवारी, राधे कुमार, सुनील कुमार आणि कपिल कुमार.
अर्ध मॅरेथॉन : (पुरुष) - व्ही.एल. डांगी, राहुल कुमार पाल, गौतम त्यागी, संजीथ लुवांग, गोविंद सिंग आणि हरी शंकर शर्मा.
(महिला) - कविता राऊत, मोनिका आठारे, प्रियंका सिंग पटेल, मोनिका राऊत, रोहिणी राऊत, विजयमाला पाटील आणि मनीषा साळुंखे.

पूर्ण मॅरेथॉन नवीन विवा कॉलेजपासून सकाळी ६ वाजता सुरू होऊन याच ठिकाणी संपेल. अर्धमॅरेथॉनला वसई तहसील येथून ६.४५ वाजता सुरुवातहोऊन नवीन विवा कॉलेजजवळ समाप्त होईल. तर यानंतर ११ किमीची शर्यत नवीन विवा कॉलेजपासून सुरू होऊन वसंतनगरी मैदानात समाप्त होईल.

गेल्या चार वर्षांतील कसर या वेळी भरून काढण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्थानिक उद्योगाला चालना देण्यासाठी स्पॉन्सर्स म्हणून स्थानिक उद्योगांची निवड केली आहे; तसेच खास पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
- क्षितिज ठाकूर, आमदार

Web Title: Preparations for the Mayor Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.