प्रार्थना ठोंबरेची टेनिसमध्ये उत्तुंग भरारी

By Admin | Updated: September 28, 2014 22:30 IST2014-09-28T22:30:22+5:302014-09-28T22:30:22+5:30

भ़क़े गव्हाणे (बार्शी)- जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न यांच्या जोरावर एकापाठोपाठ एक नव्या विक्रमाची नोंद करीत आंतरराष्ट्रीय ख्यातीची टेनिसपटू सोलापूर जिल्?ातील बार्शीच्या प्रार्थना ठोंबरे हिने आज भारताचे प्रतिनिधीत्व करताना दक्षिण कोरिया येथील इंचियोन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा सोबत दुहेरीच्या लढतीत कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली़ तिच्या या कामगिरीने सोलापूर जिल्?ाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान आणखी अभिमानाने उंचावली आह़े

Praying Tomb Raft | प्रार्थना ठोंबरेची टेनिसमध्ये उत्तुंग भरारी

प्रार्थना ठोंबरेची टेनिसमध्ये उत्तुंग भरारी

क़े गव्हाणे (बार्शी)- जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न यांच्या जोरावर एकापाठोपाठ एक नव्या विक्रमाची नोंद करीत आंतरराष्ट्रीय ख्यातीची टेनिसपटू सोलापूर जिल्?ातील बार्शीच्या प्रार्थना ठोंबरे हिने आज भारताचे प्रतिनिधीत्व करताना दक्षिण कोरिया येथील इंचियोन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा सोबत दुहेरीच्या लढतीत कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली़ तिच्या या कामगिरीने सोलापूर जिल्?ाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान आणखी अभिमानाने उंचावली आह़े
जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि सातत्याच्या जोरावर दिवसेंदिवस आपल्या मानांकनात सुधारणा घडवून आणताना प्रार्थना ठोंबरेने राष्ट्रीय पातळीवर 2013 सालच्या टेनिस रँकिंगमध्ये दुसर्‍या क्रमांकापर्यंत उत्तुंग मजल मारली होती़ प्रार्थनाने आजपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि खेळातील सातत्य या जोरावर तिने भारतात महिला टेनिस रँकिंगमध्ये दुसर्‍या क्रमांकावर विराजमान होण्याचा मान मिळवला़
एकेरी मानांकनात अंकिता रैना नंतर तर दुहेरी रँकिंगमध्ये सानिया मिर्झानंतर प्रार्थना दुसर्‍या मानांकनाची खेळाडू बनली आहे. प्रार्थनाने अल्प कालावधीत हे उज्ज्वल यश संपादन केले आह़े
प्रार्थनाला जागतिक पातळीवरचे 417 नंबरचे रँकिंग मिळाले असून, 200 क्रमांकाच्या आत येण्यासाठी तिची धडपड सुरू असून, ती स्पेनमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी सातत्याने सराव करीत आहे. गतवर्षी प्रार्थनाचे जागतिक रँकिंग 950 इतके होते. आता ती झेप घेत 417 व्या क्रमांकावर आली आहे.
प्रार्थना ठोंबरेचे प्रायोजकत्व भारत फोर्ज या कंपनीने घेतलेले असून, यासाठी लक्ष्य ग्रुप प्रयत्नशील आहे. तिने गेल्या चार महिन्यांमध्ये मुंबई, पुणे, दिल्ली आणि इंडोनेशियातील स्पर्धेत खेळली असून, आता दक्षिण कोरियातील इंचियोनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून जिल्?ाचेच नव्हे तर देशाचेही नाव लौकिक केले आह़े निरंतर सातत्यामुळे पहिल्या क्रमांकावर जाण्याची प्रार्थनाला संधी आहे. जुलै 2009 मध्ये स्पेन (युरोप) व्हॅलेन्सिया येथील व्हॅल अकॅडमी येथील प्रशिक्षण शिबिरासाठी सलग दुसर्‍यांदा तिची निवडक खेळाडूंमध्ये भारताकडून निवड झाली होती़ यावेळी तिला जागतिक पहिल्या दहा अव्वल खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली़ तिने रॉजर फेडरर, नदाल, नालबंडियन, कारकोस, सॅफीन आदी खेळाडूंबरोबर सामने खेळले आहेत.
जगाच्या नकाशावर बार्शीचे नाव नेणार्‍या प्रार्थनाने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना बक्षिसांची अक्षरश: लयलूट केली आह़े दिल्ली येथे ऑक्टोबर 2009 मध्ये झालेल्या एशियन लॉन टेनिस स्पर्धेत तिने 17 वर्षांखालील गटाच्या भारतीय संघाचे प्रतिनिधीत्वही केले आह़े

Web Title: Praying Tomb Raft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.