शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

प्रशांत मोरे - रश्मी कुमारी राष्ट्रीय कॅरम विजेते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 9:01 PM

प्रशांत मोरेने विदर्भच्या इर्शाद अहमदला २२-२१, २५-१३ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून आपल्या पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली.

मुंबई : अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या यजमानपदाखाली संपन्न झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ४७  व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने विदर्भच्या इर्शाद अहमदला २२-२१, २५-१३ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून आपल्या पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रिझर्व्ह बँकेच्याच माजी राष्ट्रीय विजेत्या झाहीर पाशाने महाराष्ट्राच्या राजेश गोहीलला  चुरसशीच्या लढतीत पहिला सेट १०-२५ असा गमाविल्यानंतरही पुढील दोन सेट २३-१०, २५-५ असा जिंकला. 

 महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात   पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाच्या रश्मी  कुमारीने जैन इरिगेशनच्या ऐशा महम्मदला १९-७, २५-७ अशी धूळ चारत विजेतेपद पटकाविले. रश्मीचे ही १० वे राष्ट्रीय विजेतेपद असून कॅरममध्ये सर्वाधिक राष्ट्रीय विजेतेपदाचा मान पटकाविणारी कॅरमपटू म्हणून तिने विक्रम  केला आहे. यापूर्वी ९ वेळा राष्ट्रीय विजेतेपद  पटकाविण्याचा विक्रम तामिळनाडूच्या ए मारिया इरुदयमच्या ( इंडियन एरलाईन्स ) नावे  होता. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या  लढतीत विश्व् विजेत्या एस अपूर्वाने जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला २५-९, २०-२५, २५-४ असे हरविले. 

 महिला वयस्कर गटात महाराष्ट्राच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मालती केळकरने महाराष्ट्राच्याच रोझिना गोदादला ६-२२, १९-१३, १५-१२ असे हरवून विजयावर शिक्कमोर्तब केला. तर पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शब्बीर खानाने महाराष्ट्राच्या अस्लम चिकतेला २५-७, २५-८ असे पराभूत करून विजय मिळविला. 

विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर, सचिव वी डी नारायण, राष्ट्रीय कॅरम महासंघाच्या सचिव भारती नारायण, पुरस्कृत भरतीय  आयुर्विमा महामंडळाच्या  कुडाळ शाखेचे शाखा व्यवस्थापक  प्रमोद गुळवणी तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष शांताराम गोसावी  व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अवधूत भणगे आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील व्हाईट स्लॅम व ब्लॅक करणाऱ्या सर्व विजेत्यांना आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर यांनी प्रत्येकी ५० डॉलर्स तर कुडाळ तालुका कॅरम संघटनेने कोकणी मेव्याचे डबे दिली. स्पर्धेचे इक्विपमेंट पार्टनर सिस्का कॅरम कंपनीतर्फे चारही विजेत्याना सिस्का फायटर बोर्ड भेट देण्यात आले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र