प्रणय, शुभांकर, प्रणव, सिक्की तिसऱ्या फेरीत

By Admin | Updated: March 17, 2017 00:28 IST2017-03-17T00:28:04+5:302017-03-17T00:28:04+5:30

गत चॅम्पियन एच.एस. प्रणय आणि शुभांकर डे यांनी स्विस ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली

Prannoy, Shubhankar, Pranav, Sikki third round | प्रणय, शुभांकर, प्रणव, सिक्की तिसऱ्या फेरीत

प्रणय, शुभांकर, प्रणव, सिक्की तिसऱ्या फेरीत

बासेल : गत चॅम्पियन एच.एस. प्रणय आणि शुभांकर डे यांनी स्विस ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
जानेवारी महिन्यात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या प्रणव जेरी चोपडा आणि सिक्की रेड्डी ही जोडीदेखील मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचली. या दोघांना दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली.
पाचव्या मानांकित प्रणयने ४३ मिनिटे रंगलेल्या लढतीत स्कॉटलंडच्या किरान मेरिलीसला २१-१७, २१-१९ असे पराभूत केले. आता त्याचा सामना चीनच्या १0 व्या मानांकित कियाओ बिन याच्याशी होईल.
जानेवारीत आइसलँड इंटरनॅशनल जिंकणाऱ्या शुभांकरने स्लोव्हेनियाच्या इजोक उत्रोसा याचा २१-१७, २१-१८ असा पराभव केला. चौथ्या मानांकित प्रणव आणि सिक्कीने प्री क्वॉर्टर फायनलमध्ये मजल मारली.
या जोडीविरुद्ध स्वीडनच्या निको रुपोनेन आणि अमांडा होगस्ट्रोम यांनी माघार घेतली. रिओ आॅलिम्पियन मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांना अव्वल मानांकित चीनच्या चाई बियाओ आणि होंग वेई यांनी २१-१५, २१-१९ अशी मात दिली.
(वृत्तसंस्था)

Web Title: Prannoy, Shubhankar, Pranav, Sikki third round