प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदाची ‘हॅट्ट्रिक’

By Admin | Updated: December 22, 2016 00:28 IST2016-12-22T00:28:18+5:302016-12-22T00:28:18+5:30

प्रफुल्ल पटेल बुधवारी चार वर्षांसाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

Praful Patel's presidential election 'hatrick' | प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदाची ‘हॅट्ट्रिक’

प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदाची ‘हॅट्ट्रिक’

नवी दिल्ली : प्रफुल्ल पटेल बुधवारी चार वर्षांसाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडले गेले. हा त्यांचा अध्यक्षपदाचा सलग तिसरा कार्यकाळ आहे. पटेल यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ पारदर्शकरीत्या चालविण्याचे वचन दिले. दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणुकीवरील स्थगिती उठविल्यानंतर सर्वसाधारण बैठकीचे आयोजन येथे करण्यात आले. निवडणूक अधिकारी न्या. चंद्र कांडपाल (सेवानिवृत्त) यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पटेल यांना २0१७-२0२0 या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. न्या. कांडपाल यांनी प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्ष म्हणून आणि कार्यकारी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा केली.
पटेल हे प्रियरंजन दासमुन्शी २००८ मध्ये आजारी पडल्यानंतर एआयएफएफच्या प्रभारी अध्यक्षपदी विराजमान झाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Praful Patel's presidential election 'hatrick'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.