राष्ट्रकुलमध्ये प्रदीप सिंगला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 04:17 IST2019-07-14T04:17:36+5:302019-07-14T04:17:39+5:30
भारताच्या प्रदीपने क्लीन अँड जर्क प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम नोंदवीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

राष्ट्रकुलमध्ये प्रदीप सिंगला सुवर्णपदक
आपिया : भारताच्या प्रदीपने क्लीन अँड जर्क प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम नोंदवीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. प्रदीपने शनिवारी १०९ किलो वजनी गटात क्लीन अँड जर्क प्रकारात २०२ किलो वजन उचलून नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याआधी त्याने पहिल्या प्रयत्नात १४८ किलोंचे वजन उचलले होते. त्यामुळे त्याने एकूण ३५० किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला आणि सुवर्णकमाई केली.
विकास ठाकूर याने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. विकासने दोन प्रयत्नांत १५३ किलो आणि १८५ किलो असे मिळून एकूण ३३८ किलो वजन उचलून रौप्यपदकाला गवसणी घातली. दरम्यान, या स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सने एकूण ३५ पदकांची कमाई केली. यासह भारतीय खेळाडूंनी युवा, कनिष्ठ आणि वरिष्ठ गटांत अनेक जुने विक्रम मोडले.