सराव सामना : भारताचा आयर्लंडवर २९ धावांनी विजय

By Admin | Updated: March 10, 2016 22:25 IST2016-03-10T22:25:18+5:302016-03-10T22:25:18+5:30

मधल्या फळीतील फलंदाज स्मृती मानधना हिने केलेल्या ७३ धावांच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्व टी-२० अभ्यास सामन्यात आर्यंलंडला २९ धावांनी पराभूत केले.

Practice match: India beat Ireland by 29 runs | सराव सामना : भारताचा आयर्लंडवर २९ धावांनी विजय

सराव सामना : भारताचा आयर्लंडवर २९ धावांनी विजय

बंगळूरू : मधल्या फळीतील फलंदाज स्मृती मानधना हिने केलेल्या ७३ धावांच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्व टी-२० अभ्यास सामन्यात आर्यंलंडला २९ धावांनी पराभूत केले.
भारतीय संघाने सामना जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकांत चार गडी गमावून १४७ धावा केल्या. आणि आयर्लंडने ९ गडी गमावत ११८ धावा केल्या.
स्मृतीने आपल्या ५२ चेंडूच्या खेळीत १० चौकार आणि एक षटकार लगावला. तिच्या शिवाय वेदा कृष्णमूर्तीने २६ आणि हरमनप्रीत कौर हिने २४ धावांचे योगदान दिले. आयर्लंडकडून किम गार्थ हिने १६ धावा देत तीन गडी बाद केले.
भारताची जलदगती आणि फिरकी गोलंदाजीच्या मिश्रणापुढे आयर्लंडच्या केथ डालटन (३७) आणि इसाबेल जायस (२८) याच धावा करू शकल्या. भारताकडून निरंजना नागराजन आणि शिखा पांडे हिने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Web Title: Practice match: India beat Ireland by 29 runs