शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

प्रबोधन आंतर-शालेय क्रीडा महोत्सव : दीपक, आदिती, आर्य, जीविधा यांना तिरंदाजीत प्रत्येकी तीन सुवर्णपदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 18:19 IST

रिकर्व्ह राऊंड ओव्हरऑलमध्ये मुलांच्या विभागात ध्रुव देसाई (१२ वर्षाखालील), आर्यन वाबळे (१४ वर्षाखालील) आणि श्रेयस निवास्कर (१७ वर्षाखालील) तर मुलींमध्ये कृष्ण नाईक (१२ वर्षाखालील), स्वरा  पटेल (१४ वर्षाखालील) आणि सुश्मिता कांबळे (१७ वर्षाखालील) असे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.

मुंबई: एम.एन. इंग्लिश हायस्कूलचा दीपक यादव आणि सेंट जोसेफ वांद्रे या शाळेची आदिती म्हात्रे यांनी ४१ व्या प्रबोधन आंतर-शालेय क्रीडा महोत्सवामध्ये चमकदार कामगिरी बजावताना तिरंदाजी या क्रीडा प्रकारामध्ये प्रत्येकी तीन सुवर्णपदके पटकावली. या दोघांनी इंडियन राऊंडमधील ओव्हरऑल तसेच ४० आणि ३० मीटर्समध्ये (१७ वर्षाखालील वयोगटात) अव्वल स्थान मिळविले. आदितीला तसे कोणतेच आव्हान नव्हते मात्र दीपकला त्याच्याच शाळेचा सुधीर साहनी याचा तिन्ही स्पर्धांमध्ये मुकाबला करावा लागला. गेली चार-पाच वर्षे तिरंदाजी हा खेळ मुंबईच्या उपनगरामध्ये बऱ्यापैकी मूळ धरू लागला आहे हे प्रबोधनच्या क्रीडांगणावर उपस्थित तिरंदाजांची शंभरावरील संख्या पाहता सिद्ध झाले. या स्पर्धेमध्ये नानावटी विद्यामंदिरचा आर्य कुलकर्णी याने आर्य विद्यामंदिर वांद्रे या शाळेचा गुरजीव सिंघ कोहली याला इंडियन राऊंड ओव्हरऑल, ३० आणि २० मीटर्समध्ये (१४ वर्षाखालील वयोगटात) मागे टाकले व तीन सुवर्णपदके खिशात घातली. तशीच चांगली कामगिरी  स्वामी विवेकानंदच्या  रेयांश ठक्कर याने तीन सुवर्ण पदके मिळविताना केली. त्याने इंडियन ओव्हरऑल, २० आणि १५ मीटर्स हे तीन स्पर्धा प्रकार जिंकले. चिल्ड्रन्स अकादमी, कांदिवलीचा पूरब परमार दोन रौप्य पदकांचा मानकरी ठरला. हे दोघे १२ वर्षाखालील वयोगटात खेळले. मुलींच्या १४ आणि १२ वर्षाखालील वयोगटामध्ये अनुक्रमे जीविधा पटेल आणि मिताली निमजे यांनी तृतीय यश संपादन केले. रिकर्व्ह राऊंड ओव्हरऑलमध्ये मुलांच्या विभागात ध्रुव देसाई (१२ वर्षाखालील), आर्यन वाबळे (१४ वर्षाखालील) आणि श्रेयस निवास्कर (१७ वर्षाखालील) तर मुलींमध्ये कृष्ण नाईक (१२ वर्षाखालील), स्वरा  पटेल (१४ वर्षाखालील) आणि सुश्मिता कांबळे (१७ वर्षाखालील) असे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. कंपाऊंड ओव्हरऑल या तिसऱ्या प्रकारात मुलांच्या विभागात हृदय शहा, क्रिश जाधव आणि स्टीव्ह फिलिप्स तर मुलींमध्ये राचेल थोमस, कोह्ना स्वामी आणि गायत्री बंदरकर यांनी अनुक्रमे १२,१४ आणि १७ वर्षाखालील वयोगटांमध्ये अव्वल स्थान पटकावले.

टॅग्स :Mumbaiमुंबई