स्लेजिंगमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची शक्यता

By Admin | Updated: February 11, 2015 01:34 IST2015-02-11T01:34:11+5:302015-02-11T01:34:11+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्लेजिंगविरुद्ध कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला असून, विश्वकप स्पर्धेत खेळाडू स्लेजिंगमध्ये दोषी आढळला

The possibility of suspension action on those found guilty in sledding | स्लेजिंगमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची शक्यता

स्लेजिंगमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची शक्यता

मेलबोर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्लेजिंगविरुद्ध कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला असून, विश्वकप स्पर्धेत खेळाडू स्लेजिंगमध्ये दोषी आढळला, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्य आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, ‘‘एखादा खेळाडू स्लेजिंगमध्ये पहिल्यांदा
दोषी आढळला, तर त्याला मोठ्या रकमेच्या दंडाला सामोरे जावे लागेल आणि त्याने ही चूक
पुन्हा केली, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येऊ शकते.’’रिचर्डसन पुढे म्हणाले, ‘‘आम्ही मैदानावर खेळाडूंच्या वर्तनावर नजर ठेवून असून, दोषी खेळाडूंबाबत दया-माया दाखविण्यात येणार नाही. ज्या खेळाडूंचे मैदानावरील
वर्तन चर्चेचा विषय आहे, त्या खेळाडूंनी विश्वकप स्पर्धेदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केले,
तर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.’’
आयसीसीच्या या निर्णयानंतर विराट कोहली, शिखर धवन आणि आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांना संयम बाळगावा लागणार आहे. या खेळाडूंवर उभय देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान दंड ठोठावण्यात आला होता.
(वृत्तसंस्था)

Web Title: The possibility of suspension action on those found guilty in sledding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.