सर्वसाधारण सभा पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता
By Admin | Updated: September 3, 2015 22:38 IST2015-09-03T22:38:11+5:302015-09-03T22:38:11+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) यंदाची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबरला होणारी ही स्पर्धा पुढे

सर्वसाधारण सभा पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) यंदाची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबरला होणारी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचे निश्चित झाल्यानंतर कधी होईल याबाबतीत अद्याप माहिती मिळाली नाही. बीसीसीआयच्या विविध उप-समितीच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदींची अद्याप पूर्तता न झाल्याने ही सभा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सूत्रांकडून कळले.
त्याचबरोबर सध्या बीसीसीआयला एन. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीवरूनदेखील विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच श्रीनिवासन यांना सभेमध्ये उपस्थित राहण्याची अनुमती मिळणार की नाही, याबाबत बीसीसीआयला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. याबाबत बीसीसीआय लवकरच एक अर्ज करून श्रीनिवास यांच्या उपस्थितीबाबतचे संभ्रम दूर करणार असल्याचे कळाले. या विषयी बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले, की या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागेल. तसेच कार्यकारणी समिती पुढील बैठक कधी घेणार, हे अजून निश्चित नाही. त्याचबरोबर बीसीसीआयला आयपीएलमधील विस्कटलेली कामे मार्गी लावायची असून, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांच्या निलंबनावरदेखील काम करायचे आहे. त्याव्यतिरिक्त बीसीसीआयला सल्लागार समितीसह भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा तिढा सोडवायचा आहे.