शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या लग्नाचा खर्च उचलण्यासाठी 'ती' धावली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 16:06 IST

भारतात खेड्यापाड्यात अनेक होतकरू खेळाडू घडत आहे, पण दुर्दैवाने त्यांचा मार्ग हा त्यांच्या आयुष्याप्रमाणे खाचखळग्यांचाच आहे.

मुंबई : भारतात खेड्यापाड्यात अनेक होतकरू खेळाडू घडत आहे, पण दुर्दैवाने त्यांचा मार्ग हा त्यांच्या आयुष्याप्रमाणे खाचखळग्यांचाच आहे. त्यांना स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजूनही प्रत्येक टप्प्यावर झगडावे लागत आहे आणि त्यात घरच्यांची जबाबदारी खांद्यावर असल्यास त्यांना दुहेरी कसरत करावी लागते. याच दुहेरी कसरतीतही सर्व खेळाडू यशस्वी होतीलच असे नाही, परंतु जे यशस्वी होतात ते अनेकांसमोर प्रेरणा ठेवून जातात. असाच एक प्रेरणादायी पल्ला पुण्याच्या पूनम सोनुने हीने गाठला आहे. धावपटू बनण्याच्या स्वप्नाबरोबरच मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या खर्चाचा भार तिने स्वतःच्या खांद्यावर घेतला. शर्यतीतून मिळत गेलेल्य बक्षीसातून तिनं बहिणीचं लग्नही लावून दिले, परंतु तिला मात्र बहिणीच्या डोक्यावर अक्षता टाकता आल्या नाही.पूनमचे वडील शेतमजुरी करून पत्नी, तीन मुली आणि मुलाच्या संसाराचा गाडा हाकतात. तुटपुंजा मजुरीवर त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. पूनमची आई शहरात जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय करते. अशात पूनमच्या वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नाचा निर्णय घेतला. आपले वडील लग्नाचा आर्थिक भार पेलू शकत नाही, याची कल्पना असल्याने पूनमने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील सागवान गावची पूनम नाशिक येथील विजेंद्रसिंह यांच्याकडे सराव करते.  

मोठी बहीण रुपालीचे लग्न झाले आणि दुसरी मोठी बहीण साधनाचे बीएपर्यंत शिक्षण झालेले आहे. तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली. साधनाच्या लग्नाचा खर्च उचल्याचा निश्चय करत पूनमने पुणे येथे पुनावाला क्लिन सिटी मॅरेथॉन होती. 21 किलोमीटरचे अंतर धावण्याचा पूनमला सराव नसतानाही ती शर्यतीत उतरली. ती केवळ शर्यतीत उतरली नाही तर 1.25 लाखांचे बक्षीस जिंकून तिनं लग्नाचा भार उचलला. 

पण, ज्यासाठी तिनं ही धडपड केली, त्या लग्नाला मात्र तिला हजर राहता आले नाही. आगामी दक्षिण आशिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आणि बहिणीचे लग्न व स्पर्धा एकाच वेळी आली. आता पूनमला ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. खेळाच्या माध्यामातून नोकरी लागल्यास तिला वडिलांनी घेतलेले कर्जही फेडायचे आहे.   

टॅग्स :Puneपुणे