आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये पूजा-सुर्थीथा जोडीला कांस्य

By Admin | Updated: July 6, 2017 01:47 IST2017-07-06T01:47:38+5:302017-07-06T01:47:38+5:30

महाराष्ट्राची पूजा सहस्रबुद्धे आणि सुर्थीथा मुखर्जी यांनी बुधवारी गोल्ड कोस्ट सीमास्टर आॅस्ट्रेलिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेत महिला

Pooja-Surnitha Jodi Bronze in Australian Open | आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये पूजा-सुर्थीथा जोडीला कांस्य

आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये पूजा-सुर्थीथा जोडीला कांस्य

नवी दिल्ली : महाराष्ट्राची पूजा सहस्रबुद्धे आणि सुर्थीथा मुखर्जी यांनी बुधवारी गोल्ड कोस्ट सीमास्टर आॅस्ट्रेलिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले. या जोडीला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय जोडी चेन मेंग आणि झू लिंग या चीनच्या अव्वल मानांकित जोडीसमोर टिकाव धरू शकली आणि त्यांना ४-११, ६-११, २-११ असा उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. पुणे येथील पूजा सहस्रबुद्धे आणि सुर्थीथा या भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत मियाओ आणि जियान फेंग या आॅस्ट्रेलियन जोडीचे आव्हान ९-११, १४-१२, ११-८, ११-९ असे संपुष्टात आणताना सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला होता. त्याआधी पुरुष एकेरीच्या राऊंड आॅफ ३२ मध्ये हरमनप्रीत देसाईला १२व्या मानांकित जपानच्या महारुयोशिमुरा याने ११-७, ११-६, १६-१४, ११-८ असे पराभूत केले. सानील शेट्टी याने १३व्या मानांकित कोरियाच्या जांग वूजिन याला ११-९, ३-११, १२-१0, ११-३, ६-११, ११-८ अशी मात दिली. जी. साथियान याने चिनी तैपेईच्या १४व्या मानांकित चेन चिएन आन याचा ११-६, ४-११, १-११, ११-९, ११-८, ११-९ असा पराभव
केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Pooja-Surnitha Jodi Bronze in Australian Open