अव्वल दहामध्ये स्थान मिळवणार -पोनप्पा

By Admin | Updated: July 6, 2015 01:15 IST2015-07-06T01:15:49+5:302015-07-06T01:15:49+5:30

कॅनडा ओपनमध्ये ज्वाला गुट्टाच्या साथीने जेतेपद पटकावणारी बॅडमिंटनपटू आश्विनी पोनप्पाने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणे आणि त्या दरम्यान अव्वल १०मध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे.

Ponnappa will get a place in top ten | अव्वल दहामध्ये स्थान मिळवणार -पोनप्पा

अव्वल दहामध्ये स्थान मिळवणार -पोनप्पा



मुंबई : कॅनडा ओपनमध्ये ज्वाला गुट्टाच्या साथीने जेतेपद पटकावणारी बॅडमिंटनपटू आश्विनी पोनप्पाने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणे आणि त्या दरम्यान अव्वल १०मध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे.
आश्विनी म्हणाली, ‘आॅलिम्पिकमध्ये अव्वल १६ जोड्या पात्र ठरणार असून आम्हाला अव्वल १३ मध्ये स्थान मिळवावे लागेल. अव्वल १० मध्ये स्थान मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची प्रक्रिया मे महिन्यापासून प्रारंभ झाली असून पुढील वर्षी मे महिन्यात संपणार आहे. काही स्पर्धा शिल्लक आहेत, पण अखेरच्या क्षणापर्यंत काही सांगता येणार नाही. अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे.’
आश्विनी म्हणाली, ‘जेव्हा २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती, तेव्हा आम्हाला इंडियन ओपनपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. आम्ही उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालो असतो तर अपात्र ठरलो असतो.’
ज्वाला व आश्विनी यांची जोडी सध्या जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी आहे. त्यांच्यासाठी पहिली प्रतिष्ठेची स्पर्धा पुढील महिन्यात जकार्तामध्ये होणारी विश्व चॅम्पियनशिप आहे. या स्पर्धेत आमची जोडी विजयासाठी प्रयत्नशील आहे, असेही आश्विनी म्हणाली. यापूर्वी ज्वाला-आश्विनी जोडीने २०११ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते.

Web Title: Ponnappa will get a place in top ten