कविता, खंडू प्रथम
By Admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:18+5:302014-08-27T21:30:18+5:30
क्रॉस कंट्री : सिद्धार्थ महाविद्यालयाला सांघिक विजेतेपद

कविता, खंडू प्रथम
क रॉस कंट्री : सिद्धार्थ महाविद्यालयाला सांघिक विजेतेपदऔरंगाबाद : खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत जालना येथील दानकुंवर महाविद्यालयातील कविता बनसोडे आणि नळदुर्ग येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील खंडू वटकट यांनी अनुक्रमे मुली आणि मुलांच्या गटात अव्वल स्थान मिळवले. जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाने पुरुष गटात सांघिक विजेतेपद पटकावले. महिला गटात जालना येथील दानकुंवर महाविद्यालयाने सांघिक अजिंक्यपद मिळवले.निकाल पुरुष : १. खंडू वटकट (कला व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग), २. संदीप फुगट (वैद्यनाथ महाविद्यालय, परळी), ३. अविनाश दाणे (पी. जी. जिमखाना, औरंगाबाद), ४. परसराम दिधोत (आसाराम भांडवलदार महाविद्यालय), ५. गणेश भोसले (चिश्तिया महाविद्यालय, खुलताबाद), ६. महेश फोकले (के. एस. के. महाविद्यालय, बीड).महिला गट : १. कविता बनसोडे (दानकुंवर महाविद्यालय), २. तेजस्विनी बाहेती (एम. एस. एम. महाविद्यालय), ३. छाया राठोड (शिवछत्रपती महाविद्यालय, पाचोड), ४. प्रियंका वडमारे (शिवछत्रपती महा., पाचोड), ५. शिल्पा पंजाजी (दानकुंवर महा., जालना), ६. रिटा चोंडिया (विवेकानंद महाविद्यालय).स्पर्धेचे उद्घाटन कोहिनूर महाविद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव मजहर खान यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता एस. एस. शेख, एम. ए. बारी, पी. एल. कराड, युसूफ पठाण, प्राचार्य शेख आरीफ यांची उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)