पोद्दार, ज्ञानदीप, बुर्हाणी स्कूल विजयी
By Admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:03+5:302014-08-29T23:33:03+5:30
औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या नेहरू चषक स्पर्धेत पोद्दार, ज्ञानदीप विद्यालय, बुर्हाणी नॅशनल, होलीक्रॉस आणि स. भु. महाविद्यालयाने विजय मिळवला.

पोद्दार, ज्ञानदीप, बुर्हाणी स्कूल विजयी
औ ंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या नेहरू चषक स्पर्धेत पोद्दार, ज्ञानदीप विद्यालय, बुर्हाणी नॅशनल, होलीक्रॉस आणि स. भु. महाविद्यालयाने विजय मिळवला.१४ वर्षांखालील गटात पोद्दार आयसीएसईने होलीक्रॉस मराठी हायस्कूलचा ४-0 असा पराभव केला. विजयी संघाकडून ध्रुवेश देवडाने २, तर परितोष शर्मा, गौरव काळे यांनी प्रत्येकी १ गोल केला. १७ वर्षांखालील गटात ज्ञानदीप विद्यालयाने सेंट जोन्स हायस्कूलवर ३-0 गोलने मात केली. ज्ञानदीप विद्यालयाकडून विशाखा साळवे, उषा जाधव, रूपाली प्रधान यांनी प्रत्येकी १ गोल केला. याच वयोगटात बुर्हाणी नॅशनलने मिलिंद हायस्कूलवर २-0 गोलने विजय मिळवला. बुर्हाणी नॅशनलकडून आवेज खान, शेख मुजीब यांनी प्रत्येकी १ गोल केला. याच गटात सरस्वती भुवन महाविद्यालयाने सेंट जोन्सवर ४-0 असा दणदणीत विजय मिळवला. विजयी संघाकडून कुणाल रायतेने २ गोल केले. अथर्व चिपळूणकर व जितू पुरोहित यांनी प्रत्येकी १ गोल केला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात होलीक्रॉस इंग्लिश स्कूलने ज्ञानदीप विद्यालयावर ३-0 अशी मात केली. विजयी संघाकडून लिऑन फर्नांडिस, प्रणव जोगदंडे व ईशाद अली यांनी प्रत्येकी एक गोल केला.तत्पूर्वी, राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त राष्ट्रीय हॉकीपटू शेख दानिश, विशाखा साळवे, प्रियंका वाहूळ, प्रियंका वडमारे, नाजुका मोहिते, यशोवर्धन देशमुख, शेख अल्ताफ, अंजली चव्हाण, सरूताई कुंभार, शेख उमेर, माजीद सिद्दीकी, प्रीतीश सोनवणे यांचा मनपा आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, गोकुळ तांदळे, संजीव बालय्या, चव्हाण, एम. झेड. शेख आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)