जबाबदारीने खेळा : कूक

By Admin | Updated: September 1, 2014 01:43 IST2014-09-01T01:43:41+5:302014-09-01T01:43:41+5:30

कार्डिफमध्ये इंग्लंडला डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे.

Play responsibly: Cook | जबाबदारीने खेळा : कूक

जबाबदारीने खेळा : कूक

नॉटिंघम : आघाडीच्या फळीतील एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता न आल्यामुळे भारताविरुद्ध काल, शनिवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यात सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकने व्यक्त केली.
कार्डिफमध्ये इंग्लंडला डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे.
कूक म्हणाला, ‘वन-डे क्रिकेटमध्ये झपाट्याने बदल करता येतो; पण त्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. आघाडीच्या फळीतील एखाद्या फलंदाजाने शतक झळकाविणे आवश्यक असून, त्यानंतर प्रत्येकाकडून उपयुक्त योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे ३३० धावापर्यंत मजल मारता येईल. आघाडीच्या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.’

Web Title: Play responsibly: Cook