ब्लॅटर यांच्याविरुद्ध उभे राहण्यास प्लातिनी यांचा नकार
By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:31+5:302014-08-28T20:55:31+5:30
मोनाको : यूएफा अध्यक्ष मायकल प्लातिनी यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी होणार्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सॅप ब्लाटर यांच्याविरुद्ध आपले नाव मागे घेतले आहे.

ब्लॅटर यांच्याविरुद्ध उभे राहण्यास प्लातिनी यांचा नकार
म नाको : यूएफा अध्यक्ष मायकल प्लातिनी यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी होणार्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सॅप ब्लाटर यांच्याविरुद्ध आपले नाव मागे घेतले आहे.५९ वर्षीय प्लातिनी यांनी यूएफाच्या ५४ सदस्यीय संघटनेचे चेअरमन आणि महासचिवांना सांगितले की, त्यांनी ७८ वर्षीय स्वीत्झर्लंडच्या ब्लॅटर यांच्याविरुद्ध उभे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे याआधी ब्लॅटर यांनी फिफाच्या अध्यक्षपदासाठी एका नव्या व्यक्तीला उभे करण्याविषयी बोलले जात होते. यूएफा आणि फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य मायकल डी हूग यांनी प्लातिनी यांची भेट घेतली होती. ही खूपच सकारात्मक भेट होती आणि चर्चेने आपण खूप खुश आहोत, असे मायकल म्हणाले.तथापि, त्याआधी फिफाचे उपमहासचिव ५६ वर्षीय जेरोम केम्पेग्ने यांनी जानेवारी महिन्यात ब्लॅटर यांच्याविरुद्ध उमेदवारीची घोषणा केली होती. ब्लॅटर यांना युरोपच्या बाहेर खूप पाठिंबा आहे आणि प्लातिनी ब्लॅटर यांना कडवे आव्हान देऊ शकतात, असे मानले जात होते.