शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PKL 2019 : प्रो कबड्डीचा विजेता होणार मालामाल; खेळाडूंवरही वर्षाव! कोणाला किती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 15:30 IST

PKL 2019 : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे आणि त्याचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे.

मुंबई, प्रो कबड्डी लीग 2019 : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे आणि त्याचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. प्रो कबड्डीच्या इतिहासात पाटणा पायरेट्स हा सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्यांनी तीनवेळा जेतेपदाचा चषक उंचावला आहे. त्यांच्याशिवाय जयपूर पिंक पँथर्स, यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स यांनी प्रत्येकी एक जेतेपद जिंकली आहेत. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात 20 जुलैला सलामीचा सामना हैदराबाद येथे होणार आहे. पहिल्याच दिवशी सध्याच विजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स यांच्यात दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे.यंदाची लीग ही साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल, तर मंगळवार हा विश्रांतीचा दिवस असणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्यापूर्वी संघाला चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे. प्रो कबड्डीमध्ये यंदा एकूण 8 कोटी रुपयांच्या बक्षीसांचं वाटप होणार आहे. प्रो कबड्डीच्या विजेत्या संघाला 3 कोटी रुपये दिले जाणार आहेत, तर उपविजेता 1.80 कोटी घेऊन जाईल. याशिवाय लीगमधील सर्वोत्तम खेळाडूला 15 लाख आणि सर्वोत्तम चढाईपटू व बचावपटूला प्रत्येकी 10-10 लाख दिले जाणार आहेत.

 

संघाला मिळणारी बक्षीस रक्कम...विजेता        3 कोटीउपविजेता        1.80 कोटीतिसरा क्रमांक    1.20 कोटीचौथा क्रमांक    80 लाख5/6 क्रमांक    प्रत्येकी 35 लाख वैयक्तिक पुरस्कारमोस्ट व्हॅल्यूएबल खेळाडू    15 लाखसर्वोत्तम चढाईपटू        10 लाखसर्वोत्तम बचावपटू        10 लाखसर्वोत्तम पदार्पणवीर        8 लाखसर्वोतम पंच पुरुष        3.5 लाखसर्वोतम पंच महिला        3.5 लाख

 

सहभागी 12 संघपुणेरी पलटन, जयपूर पिंक पँथर्स, दबंग दिल्ली, बंगाल वॉरियर्स, बंगळुरु बुल्स, गुजरात फॉर्च्युनजायंट्स, हरयाणा स्टिलर्स, पाटणा पायरेट्स, तमीळ थलायव्हाज, यू मुंबा, यूपी योद्धा, तेलुगु टायटन्स

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीU Mumbaयू मुंबा