IPL -9 मधून पीटरसन नंतर आता फाफ डू प्लेसिस बाहेर, पुण्याला दुसरा धक्का
By Admin | Updated: April 28, 2016 19:49 IST2016-04-28T19:39:54+5:302016-04-28T19:49:10+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वातून रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा खेळाडू केव्हिन पीटरसन बाहेर पडल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिस जखमी झाल्यामुळे

IPL -9 मधून पीटरसन नंतर आता फाफ डू प्लेसिस बाहेर, पुण्याला दुसरा धक्का
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - आयपीएलच्या नवव्या पर्वातून रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा खेळाडू केव्हिन पीटरसन बाहेर पडल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिस जखमी झाल्यामुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला दुसरा मोठा धक्का बसला.
खेऴाताना हाताच्या बोटाला जखम झाल्यामुळे माझ्या आयपीएलमधील खेऴण्यावर टाच आली आहे. जखमी झाल्यामुळे मला सहा आठवडे मैदानापासून दूर राहण्यास सांगितले. त्यामुळे मला वाईट असून भारताने आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे धन्यवाद ! असे ट्विट फाफ डू प्लेसिस याने केले आहे.
फाफ डू प्लेसिसच्या शानदार खेळीमुळे आयपीएलच्या नवव्या पर्वात रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ आघाडीवर आहे. फाफ डू प्लेसिसच्या आधी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळणारा इंग्लंडचा फलंदाज केव्हिन पीटरसन सुद्धा जखमी झाल्याने संघातून बाहेर पडला. त्यामुळे आता रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला मोठा धक्का बसल्याचे समजते.