बोल्टचे तरुणीसोबतचे बिछान्यातील फोटो व्हायरल
By Admin | Updated: August 24, 2016 15:01 IST2016-08-24T12:28:27+5:302016-08-24T15:01:39+5:30
बिजींग, लंडन त्यानंतर आता रिओ ऑलिम्पिक गाजवणारा महान धावपटू उसेन बोल्टचे रिओमधील एका तरुणीसोबतचे बिछान्यातील फोटो व्हायरल झाले आहेत.

बोल्टचे तरुणीसोबतचे बिछान्यातील फोटो व्हायरल
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. २४ - बिजींग, लंडन त्यानंतर आता रिओ ऑलिम्पिक गाजवणारा महान धावपटू उसेन बोल्टचे रिओमधील एका तरुणीसोबतचे बिछान्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. जेडी डुआर्ते असे या तरुणीचे नाव असून, ती २० वर्षांची आहे. आपण ज्याच्या बरोबर रात्र घालवली तो बोल्ट आहे हे समजल्यानंतर उत्साहाच्या भरात जेडीने तिचे फोटो व्हॉटस अॅपवरुन मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर केले. हेच फोटो नंतर व्हायरल झाले.
अनेक ब्राझीलीयन वेबसाईटवर हे फोटो व्हायरल झाले आहेत. एक्स्ट्र या स्थानिक वर्तमानपत्रासोबत बोलताना जेडी म्हणाली की, या फोटोंमुळे मला आता लाज वाटत आहे. बोल्ट बरोबर माझी ओळख झाली तेव्हा माझ्यासाठी ती अतिशय सामान्यबाब होती. कारण तो पर्यंत बोल्ट कोण आहे हे मला माहित नव्हते. नंतर मला समजले की, बोल्ट प्रसिद्ध अॅथलिट बरोबर आहे.
रविवारी बोल्टने ३० व्या वर्षात पदार्पण केले. रिओच्या एका क्लबमध्ये रात्रभर बोल्टचा बर्थ डे पार्टीचा जल्लोष सुरु होता. त्यानंतर जेडीसोबत त्याने रात्र घालवली. एका फोटोमध्ये बिछान्यामध्ये बोल्ट जेडीचे चुंबन घेताना दिसत आहे. मागच्या दोन ऑलिम्पिकप्रमाण रिओमध्येही बोल्टने सुवर्णपदकांची लयलूट केली.
अमेरिकन जलतरणपटू मायकल फ्लेप्स नंतर रिओमध्ये बोल्टच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. कासी बिनेटबरोबर बोल्टचे मागच्या दोनवर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु आहे. ऑलिम्पिक सुरु असताना बोल्ट तिच्याबरोबर लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. आता बोल्टच्या या नव्या फोटोंमुळे त्याचा संसार सुरु होणार की, मोडणार असा नवा प्रश्न माध्यमांना पडला आहे.