शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
4
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
5
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
6
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
7
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
8
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
9
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
10
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
12
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
13
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
14
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
15
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
16
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
17
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
18
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
19
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
20
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

‘फुल’राणीकडूनही निराशा, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2016 05:32 IST

किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत भारतीयांना काही अंशी दिलासा दिला

शिवाजी गोरेथेट रिओ येथून...रिओ : पदकाचे आशास्थान असलेली सायना नेहवालला रिओ आॅलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत रविवारी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत भारतीयांना काही अंशी दिलासा दिला. सायनाच्या पराभवामुळे निराशा झालेल्या भारतीय तंबूत श्रीकांतच्या विजयामुळे उत्साह संचारला. श्रीकांतने स्वीडनच्या हेन्री हसॅकॅनेनला ३३ मिनिटांमध्ये २१-६, २१-१८ने हरवून उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणारी भारताची ‘फुल’राणी सायना नेहवाल रविवारी युक्रेनची खेळाडू मारिया युलिटिनाकडून १८-२१, १९-२१ने पराभूत झाली. बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या या लढतीतील पराभवासह सायनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेली सायनाचा या लढतीतील खेळ लौकिकास साजेसा अजिबातही नव्हता. याचा पुरेपूर फायदा उचलत मारियाने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायनाचा दबदबा पाहता जागतिक क्रमवारीत ६१व्या क्रमांकावर असलेल्या मारियासाठी ही लढत सोपी नव्हती. मात्र, लयीत नसलेल्या साईनाने सामन्यात भरपूर चुका केल्या. यामुळे, अनेकदा कोर्टच्या चारही बाजूस पळताना शटलपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरूनही मारियाने बाजी मारली. सायनाच्या चुकांमुळे चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यातील दोन्ही गेममध्ये निर्णायक क्षणी युक्रेनच्या खेळाडूने गुण वसूल करीत अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले.>सायना : दुखापतीमुळे अपयशरिओ : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत साखळी फेरीत पराभव स्वीकारणारी जागतिक क्रमवारीत माजी नंबर एक खेळाडू सायना नेहवालने गुडघ्यावर सूज आल्यामुळे पराभव स्वीकारावा लागल्याची प्रतिक्रिया दिली. माझ्या गुडघ्यावर सूज असल्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. मी पट्टी बांधून खेळताना सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला कोर्टवर हालचाल करताना अडचण भासत होती. पराभव निराशाजनक आहे. ही दुखापत दीड आठवड्यापूर्वी आॅलिम्पिक स्पर्धेसाठी सरावादरम्यान झाली होती. सामन्यादरम्यान ही दुखापत उफाळली.स्पर्धा सुरू होऊन ८ दिवस झाले असले तरी, भारताची पदकांची पाटी अद्याप कोरीच आहे. अशा स्थितीत तमाम भारतीयांना सायनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ‘ग’ गटातील आपल्या अखेरच्या लढतीत तिने अपेक्षाभंग केला. सायनाने सुरुवात चांगली केली. प्रारंभी तिने ७-३ आणि पुढे १०-८ अशी आघाडी घेतली होती. मात्र, मारियाने चिवट प्रतिकार करीत ११-११ने बरोबरी साधली. दोन्ही खेळाडू प्रयत्नांची शर्थ करीत असल्याने स्कोर १७-१७ असा होता. या क्षणी मारियाने आपला खेळ उंचावत सलग ३ गुण वसूल केले आणि आघाडी २०-१७वर नेऊन ठेवली. अशा स्थितीत सायना आपल्या फटक्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली. तिचा रिटर्न शॉट कोर्टबाहेर पडताच हा गेम २१-१८ अशा फरकाने मारियाच्या नावे झाला. दुसऱ्या गेममध्येदेखील दोन्ही खेळाडू प्रत्येक गुणासाठी झुंज देत होते. मात्र, त्यात फरक होता. नेहमीसारखा दर्जेदार खेळ होत नसल्याने, तुलनेत कमजोर प्रतिस्पर्धी असूनही सायनावर एकेका गुणासाठी संघर्ष करण्याची वेळ आली होती. १५ गुणांपर्यंत दोघीही एकमेकींना गाठत होत्या. सलग २ गुण मिळवीत सायनाने आघाडी घेतल्यानंतर मारियाने काही क्षणांतच १७-१७ अशी बरोबरी गाठली. युक्रे नच्या खेळाडूने अप्रतिम स्मॅश लगावत १९-१८ने आघाडी घेतली. सायनाने १९-१९ अशी बरोबरी साधल्यानंतर ही लढत तीन गेमपर्यंत ताणली जाणार, अशी आशा भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. मात्र, अशा निर्णायक क्षणी अफलातून खेळ करीत मारियाने भारतीयांच्या आशांना सुरूंग लावला.