फेल्प्सला १९वे सुवर्ण

By Admin | Updated: August 9, 2016 00:49 IST2016-08-09T00:49:42+5:302016-08-09T00:49:42+5:30

आॅलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्स याने रिओतील जलतरण स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कारकिर्दीतील १९ व्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले

Phelps is the 19th gold | फेल्प्सला १९वे सुवर्ण

फेल्प्सला १९वे सुवर्ण

रिओ : आॅलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्स याने रिओतील जलतरण स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कारकिर्दीतील १९ व्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर अमेरिकेच्याच केटी लेदेस्की हिने महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
आपल्या पाचव्या आॅलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या ३१ वर्षीय फेल्प्स याने अमेरिका संघाला रेयान हेल्ड, सीलेब ड्रेसल यांच्या साथीने चार बाय १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात रिले टीमला गोल्ड मिळवून दिले. या खेळाडंूनी ३ मिनिटे आणि ९.९२ सेकंदांची वेळ नोंदवीत सुवर्णपदकावर ताबा मिळविला.
फेल्प्सचे आॅलिम्पिकमधील हे १९ वे सुवर्णपदक ठरले. त्याने खेळाच्या या महाकुंभात आतापर्यंत एकूण २३ पदके आपल्या नावे केली आहेत. या पदकांत १९ गोल्डसह दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. आॅलिम्पिकमधील जलतरण स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांत एकूण सहा विक्रम झाले. अमेरिका आणि आॅस्ट्रेलियाच्या खात्यात प्रत्येकी दोन सुवर्ण जमा झाले आहेत.
महिला गटात अमेरिकेच्या लेदेस्की हिने १.९१ सेकंदाची वेळ नोंदवून आपलाच पूर्वीचा विक्रम मोडीत काढत ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड पटकावले. तिने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला केवळ ५ सेकंदांच्या अंतराने पराभूत केले.
अमेरिकेच्या रिलेटीमकडून दुसऱ्या फेरीत उतरलेल्या फेल्प्सने चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गोल्ड मिळविणारा पहिलाच जलतरणपटू होण्याचा मान मिळविला आहे. फेल्प्स, रियान हेल्ड, सीलेब ड्रेसल आणि १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये विश्वचॅम्पियन नॅथन एड्रियनच्या अमेरिका रिले टीमने चार बाय १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ३ मिनिटे आणि ९.९२ सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण मिळविले.
दरम्यान, लंडन आॅलिम्पिकमधील चॅम्पियन फ्र ान्सला आॅलिम्पिकमधील जलतरणमध्ये या वेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर कांस्यपदक आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी पटकावले. स्वीडनच्या सारा जोस्ट्रोमने इतिहास रचताना जलतरण स्पर्धेत देशाला पहिले सुवर्ण मिळवून दिले. तिने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात ही कामगिरी केली. कॅनडाच्या १६ वर्षीय पेनी ओलेक्सिआक हिने रौप्य, तर अमेरिकेच्या डाना वोल्मर यांनी कांस्यपदक मिळविले. विशेष म्हणजे आई बनल्यानंतर या खेळात पदक मिळविणारी डाना दुसरीच खेळाडू ठरली आहे. यापूर्वी डारा टॉरेस हिने हा विक्रम आपल्या नावे केला होता.

भारत आज
तिरंदाजी :
वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात एलिमेंटरी राऊंड : यामध्ये भारताची दीपिकाकुमारी किंवा बोंबायलादेवी या दोघींपैकी एकीची फेरी होऊ शकते. ३२ खेळाडूंमधून जे विजयी होतील त्यातील १६ खेळाडू उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होतील : सायं. ५.३० वा.
मुष्टियुद्ध :
पुरुष : विकास कृष्णा : रात्री ८.३० वा.
रोर्इंग :
पुरुष : दत्तू भोकनळ (सिंगल स्कल) सायं. ५
नेमबाजी :
महिला : हीना सिद्धूू : २५ मी. पिस्तूल रात्री १२ वा.

Web Title: Phelps is the 19th gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.