पीटरसन
By Admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:13+5:302014-09-07T00:04:13+5:30
तरच इंग्लिश खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील -पीटरसन

पीटरसन
त च इंग्लिश खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील -पीटरसन लंडन : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये सहभाग घेतला, तर इंग्लंडचे क्रिकेटपटू मार्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतील, असे मत इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) निलंबित केलेला खेळाडू केवीन पीटरसन याने व्यक्त केले आहे़ पीटरसन पुढे म्हणाला, जोपर्यंत खेळाडू या टी-२० स्पर्धेत खेळत नाहीत़ तोपर्यंत त्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी करता येणार नाही़ आयपीएलसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत इंग्लंडच्या खेळाडूंनी खेळावे यासाठी बराच पाठपुरावा केला़ मात्र, माझ्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचे त्याने सांगितले़ इंग्लंड संघाला सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही़ इंग्लंडला वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील वन-डे मालिकेत १-४ ने मात खावी लागली़ त्यानंतर श्रीलंकेपाठोपाठ भारताकडून त्यांना वन-डे मालिका गमवावी लागली आहे़ त्यामुळे या संघावर चोहो बाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे़ पीटरसन पुढे म्हणाला, इंग्लंड संघाच्या भविष्याचा विचार केल्यास जोपर्यंत क्रिकेट मंडळ युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही़ तोपर्यंत हा संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुढे येऊ शकत नाही़ मी अनेक वर्षांपासून इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळावे यासाठी प्रयत्नशील आहे़ मात्र, कुणीही माझे ऐकायला तयार नाही याची खंत आहे, असेही तो म्हणाला़ (वृत्तसंस्था)