बॉक्सिंग इंडियाला कायमस्वरूपी सदस्यता
By Admin | Updated: November 15, 2014 01:03 IST2014-11-15T01:03:08+5:302014-11-15T01:03:08+5:30
कोरियातील जेजू आयलँड्स येथे सुरू असलेल्या आपल्या काँग्रेसमध्ये नुकतेच बॉक्सिंग इंडियाला सर्वसंमतीने कायमस्वरूपी सदस्यता दिली आहे.

बॉक्सिंग इंडियाला कायमस्वरूपी सदस्यता
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये भारताने पुन्हा पुनरागमन करताना एआयबीएने आज कोरियातील जेजू आयलँड्स येथे सुरू असलेल्या आपल्या काँग्रेसमध्ये नुकतेच बॉक्सिंग इंडियाला सर्वसंमतीने कायमस्वरूपी सदस्यता दिली आहे.
एआयबीएने जेजू आयलँड्स येथे सुरू असलेल्या काँग्रेसदरम्यान सर्वसंमतीने आम्हाला कायमस्वरूपी सदस्य बनवल्याने आम्हाला खूप आनंद वाटत असल्याचे बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी म्हटले. ते म्हणाले, बॉक्सिंग इंडिया भारताला विश्व बॉक्सिंगमध्ये नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करेल. आम्ही देशातील बॉक्सिंग खेळ वाढवण्यासाठी खूप मेहनत करू.
भारताच्या हौशी बॉक्सिंग संघटनेला निवडणुकीतील ‘संभाव्य गैरप्रकारां’मुळे डिसेंबर 2012मध्ये अस्थायी निलंबन सोसावे लागले होते. बॉक्सिंग इंडियाला एलबीआयकडून अस्थायी मान्यता मिळाली होती; परंतु त्यांना क्रीडा मंत्रलय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मान्यता दिली नव्हती. जाजोदिया म्हणाले, आमचे पुढचे पाऊल हे क्रीडा मंत्रलयाकडून मान्यता मिळवणो आणि आयओएची सदस्या घेणो हे असेल. बॉक्सिंग इंडियाचे महासचिव जय कोवली यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘बॉक्सिंग हा भारताचा प्रमुख खेळ आहे आणि खेळात आम्ही सर्वच पडतो; परंतु पडल्यानंतर उठणो हे महत्त्वाचे आहे.
बॉक्सिंग इंडिया एआयबीएच्या साथीने देशातील बॉक्सिंगचे सर्व कार्यक्रम लवकरच सुरूकरू इच्छितो. त्यात अभ्यास, विकास आणि स्पर्धा आदींचा समावेश आहे.
ते म्हणाले, आम्ही एआयबीए प्रो आणि जागतिक बॉक्सिंग मालिकेसारख्या स्पर्धेत आपली दावेदारी करू. त्यामुळे आमच्या खेळाडूंना चांगली संधी मिळेल.’’ (वृत्तसंस्था)