शिल्लक बातमी -
By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30
(फोटो मेल केले आहे. )

शिल्लक बातमी -
(फ ोटो मेल केले आहे. ) ..................................................नागपुरकर अमनच्या हाती महाराष्ट्र फुटबॉल संघाची धुरा१७ वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा मुंबई: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आयोजित १७ वर्षांखालील बी.सी. रॉय चषक या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा नागपुरच्या अमन किरनापुरेकडे सोपविण्यात आली आहे. छत्तीसगड मधील बिलासपुर येथील रेल्वे इन्स्टट्यिुटच्या मैदानावर या स्पर्धेचा थरार २ फे बु्रवारी पासून रंगणारआहे. स्पर्धेत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि बिहार यांचा एकाच गटात समावेश असल्याने हिमाचल आणि बिहार संघावर मात करुन पुढे जाण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर असणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना हिमाचल प्रदेश बरोबर मंगळवारी २ फेबु्रवारी रोजी होणार असून ४ फेब्रुवारीला बिहार विरुद्ध मैदानात उतरतील. स्पर्धेसाठी मुंबईचे रेयॉन डिसुझा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून आणि मॅनेजर म्हणून सचिन बढाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चर्चगेट येथील कुपरेज मैदानावर डिसुझा यांच्या देखरेखीखाली विविध सामने खेळवण्यात आले. त्या सामन्यामध्ये दर्जेदार कामगिरी करणार्या खेळाडूंना राज्य संघात स्थान देण्यात आले. राज्य संघात ९ मुंबईतील खेळाडूंचा, ५ पुण्यातील खेळाडंूना देण्यात आले आहे. नागपूरच्या ३ खेळाडूंना आणि ठाण्यातील २ खेळाडूंना संधी देण्यात आली असून कोल्हापुरतील एका खेळाडूची वर्णी देखील महाराष्ट्र संघात लागली आहे . (क्रीडा प्रतिनिधी) .................................................