पेले यांच्या लग्नाची 'हॅट्ट्रीक', ३३ वर्षांहून लहान असलेल्या मार्सियासह जुळल्या रेशीम गाठी

By Admin | Updated: July 10, 2016 18:52 IST2016-07-10T18:50:27+5:302016-07-10T18:52:50+5:30

फुटबॉल विश्वातील महान खेळाडू ब्राझीलचे पेले यावेळी वेगळ्याच चर्चेत आले असून शनिवारी रात्री ते तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढले आणि तेही वयाच्या ७५व्या वर्षी

Pele's marriage is 'hatrick', silk bales matched with Marcia, who is less than 33 years old | पेले यांच्या लग्नाची 'हॅट्ट्रीक', ३३ वर्षांहून लहान असलेल्या मार्सियासह जुळल्या रेशीम गाठी

पेले यांच्या लग्नाची 'हॅट्ट्रीक', ३३ वर्षांहून लहान असलेल्या मार्सियासह जुळल्या रेशीम गाठी

ऑनलाइन लोकमत
साओ पावलो, दि. १० : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू ब्राझीलचे पेले यावेळी वेगळ्याच चर्चेत आले असून शनिवारी रात्री ते तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढले आणि तेही वयाच्या ७५व्या वर्षी. गेल्या सहावर्षांपासून प्रेयसी असलेल्या मार्सिया सिबेले आओकी हिच्यासोबतच पेले यांनी लग्न केले. दखल घेण्याची बाब म्हणजे मार्सिया ही पेले यांच्याहून ३३ वर्षांनी लहान आहे.
पेले यांनी येथील एका वर्तमानपत्रासह बोलताना सांगितले की, यंदा त्यांना आयुष्यभरासाठी खरं प्रेम मिळाले आहे. पेले आणि मार्सिया १९८०च्या दशकात न्यूयॉर्क येथे भेटले होते. मात्र त्यानंतर २०१० साली साओ पावलो येथे एका एलेवेटरवर पुन्हा एकदा भेट झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते.

दरम्यान, अत्यंत साध्या पध्दतीने लग्नसमारंभ उरकताना पेले यांनी कोणताही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. पेले यांचे याआधी दोनवेळा लग्न झाले असून रोसमेरी चोलबी ही त्यांची पहिली पत्नी आहे आणि तीच्यापासून पेले यांना तीन अपत्य आहेत. तसेच अभिनेत्री एसिरिया नासीमेंटो हिच्याशी पेले यांचे दुसरे लग्न झाले असून एसिरियापासून देखील पेले यांना दोन अपत्य आहेत.

मार्सिया सध्या ४२ वर्षांची असून ती व्यावसायिक आहे. २०१२ सालापासून ती तीन वेळक्जे जागतिक विजेते पेले यांच्यासह सर्व सार्वजनिक कार्यक्रमात दिसते. विशेष म्हणजे, काही महिन्यांपुर्वी पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी मार्सिया त्यांच्यासोबतंच होती. जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या पेले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये १३६३ सामने खेळताना १२८१ गोल केले आहेत. यातील ९१ गोल ब्राझीलकडून खेळताना केले आहेत.

Web Title: Pele's marriage is 'hatrick', silk bales matched with Marcia, who is less than 33 years old