'अजिंक्य'ने गाठले यशाचे 'शिखर'
By Admin | Updated: September 2, 2014 21:35 IST2014-09-02T21:35:40+5:302014-09-02T21:35:40+5:30
अजिंक्य रहाणेने तब्बल १० चौकार व चार षटकार लगावत १०६ धावा केल्याने भारतीय क्रिकेट रसिकांच्या उत्साहाला उधाण आले होते

'अजिंक्य'ने गाठले यशाचे 'शिखर'
>ऑनलाइन लोकमत
बर्निंगहॅम,दि. २ - अजिंक्य रहाणेने तब्बल १० चौकार व चार षटकार लगावत १०६ धावा केल्याने भारतीय क्रिकेट रसिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. त्याला सामनवीर म्हणून गौरवण्यात आल्यावर स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. भारतासमोर २०७ धावांचे आव्हान असताना २१२ धावा करत भारताने विजय मिळवला आहे. अजिंक्य राहाणे व शिखर धवन या जोडगोळीच्या धावांनीच सामना जिंकला. रहाणेचा झेल गेल्यानंतर विराट कोहली खेळपट्टीवर आला असता त्याला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. कोहलीच्या जेमतेम नऊ धावा झाल्या असताना भारताने सामना जिंकला. तसेच रहाणे पाठोपाठ शिखर धवननेही ११ चौकार व ४ षटकार लगावत तब्बल ९७ धावा केल्या. आटोकाट प्रयत्नकरूनही धवन व रहाणेची जोडी फोडण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश येत नव्हते. जेव्हा रहाणेबाद झाला त्यावेळी त्याचे शतक पूर्ण झाले होते. तसेच भारताला सामना जिंकायला २५ धवांचीच गरज होती. इंग्लंडच्या गोलंदाजांपैकी हॅरी गुर्निच्या गोलंदाजीवर ५१ धावा मिळाल्या. तर क्रिस वॉक्स व मोईन अलीच्या गोलंदाजीवर प्रत्येकी ४० धावा केल्याने त्यांचे धाबे दणाणले होते.