‘पीबीएल’मुळे सायनाला मदतच होईल - विमल कुमार
By Admin | Updated: December 27, 2016 00:34 IST2016-12-27T00:34:55+5:302016-12-27T00:34:55+5:30
प्रीमिअर बॅडमिंटन लीग (पीबीएल) आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे खडतर नसते, त्यामुळे सायना नेहवालला यापासून दूर ठेवण्याची गरज नाही, असे मत प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले.

‘पीबीएल’मुळे सायनाला मदतच होईल - विमल कुमार
बेंगळुरू : प्रीमिअर बॅडमिंटन लीग (पीबीएल) आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे खडतर नसते, त्यामुळे सायना नेहवालला यापासून दूर ठेवण्याची गरज नाही, असे मत प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले.
दुखापतीतून सावरत असलेल्या सायनाला विश्रांती देण्याची गरज आहे, याबाबत बोलताना विमल कुमार म्हणाले, ‘सायनाला लीगपासून दूर ठेवण्याची गरज नाही. यामुळे तिची कारकीर्द फुलण्यास मदतच होईल.’
सायनासाठी यंदाचे सत्र खडतर ठरले. कारण पायाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तिने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जेतेपद पटकावले.
पीबीएल, आयपीएल किंवा अन्य लीग स्पर्धांप्रमाणे दोन महिने खेळल्या जात नाही. ही दोन आठवडे कालावधीची स्पर्धा असून प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. पीबीएलमुळे सायनाच्या सरावावर कुठला प्रभाव पडत नाही. - विमल कुमार