पेलेंना आता डायलेसिसची गरज नाही
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
साओ पाउलो:
पेलेंना आता डायलेसिसची गरज नाही
साओ पाउलो: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून, त्यांना आता डायलेसिसची गरज नाही़ मात्र किडनीच्या त्रासामुळे त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत़ पेलेंच्या प्रकृतीत जरी सुधारणा होत असली तरी त्यांच्यावर महत्त्वपूर्ण उपचार सुरु असल्याचे रुग्णालयाच्या सूत्राने सांगितल़े