पोतरुगालला घानाविरुद्ध मोठा विजय आवश्यक

By Admin | Updated: June 26, 2014 02:07 IST2014-06-26T02:07:02+5:302014-06-26T02:07:02+5:30

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जी गटात गुरुवारी पोतरुगाल आणि घाना हे संघ आमनेसामने येतील़ अंतिम 16 संघांत स्थान निश्चित करण्यासाठी पोतरुगालला मोठा विजय मिळवावा लागेल़

Patrugula needs a big victory against Ghana | पोतरुगालला घानाविरुद्ध मोठा विजय आवश्यक

पोतरुगालला घानाविरुद्ध मोठा विजय आवश्यक

>ब्रासिलिया : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जी गटात गुरुवारी पोतरुगाल आणि घाना हे संघ आमनेसामने येतील़ अंतिम 16 संघांत स्थान निश्चित करण्यासाठी पोतरुगालला मोठा विजय मिळवावा लागेल़ त्याचबरोबर गटातील अन्य लढतींवर पोतरुगालचे बाद फेरीचे समीकरण अवलंबून आह़े
पोतरुगालला बाद फेरीत जागा मिळविण्यासाठी घाना संघाविरुद्ध मोठय़ा अंतराने सामना जिंकावा लागेल़ तसेच, अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील सामना बरोबरीत सुटू नये, अशी प्रार्थनासुद्धा करावी लागणार आह़े पोतरुगालचा स्टार फुटबॉलपटू ािस्टीयानो रोनाल्डो याला स्पर्धेत अद्यापही लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही़ त्याला आतार्पयत स्पर्धेत एकही गोल नोंदविता आलेला नाही़ या स्टार खेळाडूच्या गुडघ्याला दुखापत झाली आह़े तो या लढतीत खेळेल किंवा नाही, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही़

Web Title: Patrugula needs a big victory against Ghana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.