अमेरिकेविरुद्ध पोतरुगालला विजय आवश्यक
By Admin | Updated: June 22, 2014 00:24 IST2014-06-22T00:24:28+5:302014-06-22T00:24:28+5:30
फिफा विश्वकप फु टबॉल स्पर्धेत रविवारी अमेरिका आणि पोतरुगाल एकमेकांशी झुंजणार आह़े

अमेरिकेविरुद्ध पोतरुगालला विजय आवश्यक
>मनौस : फिफा विश्वकप फु टबॉल स्पर्धेत रविवारी अमेरिका आणि पोतरुगाल एकमेकांशी झुंजणार आह़े या लढतीत स्टार स्ट्रायकर ािस्टियानो रोनाल्डो दुखापतीमुळे खेळेल किंवा नाही, याबद्दल शंका असल्यामुळे पोतरुगीज संघाच्या तयारीला झटका बसला आह़े दुसरीकडे पहिल्या लढतीत घानावर शानदार विजय मिळविणारा अमेरिका संघ आपले विजयी अभियान कायम राखून बाद फेरीत पोहोचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़
जी गटातील आपल्या पहिल्या लढतीत अनुभवी पोतरुगालला जर्मनीकडून क्-4 असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता, तर अमेरिकेने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात घानावर 2-1 असा विजय मिळविला होता़ या लढतीत अमेरिकेने विजय मिळविला, तर त्यांचा बाद फेरीत प्रवेश निश्चित होणार आह़े दुसरीकडे पोतरुगाल जर या सामन्यात पराभूत झाला, तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुश्की ओढवणार आह़े पोतरुगाल संघाचा कर्णधार ािस्टियानो रोनाल्डो गुडघ्याच्या दुखापतीमुळे या लढतीत खेळेल किंवा नाही, याबद्दल शंका आह़े विशेष म्हणजे संघातील अनुभवी डिपेंडर पेपे याला गत लढतीत रेड कार्ड मिळाल्यामुळे तो या लढतीत खेळणार नाही़ त्यामुळे संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आह़े पोतरुगाल संघातील खेळाडू मिगुएल वेलोसो याने मात्र रोनाल्डोला झालेली दुखापत गंभीर नसल्याचे म्हटले आह़े तो सराव करीत आह़े रविवारी होणा:या लढतीत तो खेळेल किंवा नाही, हे मात्र वेलोसोने सांगितले नाही़ दरम्यान, घानाविरुद्धच्या लढतीत शानदार कामगिरी करणारा अमेरिकेचा अनुभवी खेळाडू क्लाइंट डॅम्पसी दुखापतग्रस्त झाला आहे; मात्र अमेरिका संघाकडून तो सामन्यार्पयत पूर्णपणो फिट होईल, असे सांगण्यात आले आह़े अमेरिकेकडून खेळताना घानाविरुद्ध विश्वचषकात आपला पहिला गोल नोंदविणा:या जॉन ब्रुक्सकडून पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असणार आह़े तसेच स्ट्रायकर अॅरोन जॉन्सन याला दुखापतग्रस्त जोजी एल्टीडोरऐवजी संघात संधी मिळणार आह़े
अमेरिका आणि पोतरुगाल हे संघ यापूर्वी पाच वेळा आमने-सामने आले आहेत.
दोन्ही संघांनी प्रत्येकी
2 सामने जिंकले आहेत़
या दोन्ही संघांतील एक सामना बरोबरीत सुटला आह़े
जागतिक क्रमवारीत पोतरुगाल संघ चौथ्या क्रमांकावर आह़े
अमेरिका संघ जागतिक मानांकनात 13व्या स्थानावर आह़े