पार्टी पडली महागात...
By Admin | Updated: January 14, 2016 03:09 IST2016-01-14T03:09:09+5:302016-01-14T03:09:09+5:30
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या निराशाजनक दौऱ्यामध्ये मद्यप्राशन करणे आणि महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रात्रभर पार्टी करून बेशिस्तपणाच्या वर्तनासाठी श्रीलंका क्रिकेट संघाला

पार्टी पडली महागात...
कोलंबो : नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या निराशाजनक दौऱ्यामध्ये मद्यप्राशन करणे आणि महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रात्रभर पार्टी करून बेशिस्तपणाच्या वर्तनासाठी श्रीलंका क्रिकेट संघाला आता कठोर चौकशीला सामोरे जावे लागेल. न्यूझीलंड दौऱ्याहून नुकत्याच परतलेल्या श्रीलंका संघासाठी ही मोठी अडचण ठरली आहे.
विशेष म्हणजे, यावृत्ताबाबत श्रीलंकाच्या क्रीडा मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. क्रीडामंत्री दयाश्री जयशेखर यांनी सांगितले की, त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी रात्रभर पार्टी करणाऱ्या श्रीलंकाई खेळाडूंचे छायाचित्र मिळाले आहे. या दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात श्रीलंका संघाला दारूण पराभवास सामोरे जावे लागले असल्याने त्यांना चौकशीस सामोरे जावे लागेल.
जयशेखर यांनी सांगितले की, महत्त्वाच्या सामन्यापूर्वी खेळाडूंनी मद्यप्राशन व पार्टीच केली. शिवाय संघामध्येही तणावाचे वातावरण आहे. संघ देशात परतल्यानंतर मी खेळाडू आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डचे नवे अध्यक्ष थिलांगा सुमाथिपाला यांना फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. तसेच, खेळाडूंचे वर्तन माझ्यासाठी मुख्य चिंतेचे कारण होते. कारण जेव्हा बेशिस्तपणा असतो, तेव्हा साहजिकच कामगिरी खालावते, असेही जयशेखर यांनी सांगितले.