शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

गो फॉर गोल्ड! Nitesh Kumar नं गाठली फायनल; सुवर्ण पदकासाठी तो कधी अन् कुणाला देणार टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 22:28 IST

पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार (Nitesh Kumar) याने बॅडमिंटन पुरुष एकेरी गटातील SL3 प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पॅरिस येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारातही भारताचे मेडल पक्कं झालं आहे. पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार (Nitesh Kumar) याने बॅडमिंटन पुरुष एकेरी गटातील SL3 प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीतील ४८ मिनिटांच्या लढतीत त्यानं जपानच्या डीसूक फुजिहारा (Daisuke Fujihara) याला २१-१६, २१-१२ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत फायनल गाठली आहे. आता २ सप्टेंबरला तो सुवर्ण कामगिरी करण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरेल. 

सुवर्णपदकासाठीची लढत कधी? कुणाविरुद्ध भिडणार नितीश कुमार

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारातून फायनल गाठणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. सुवर्ण पदकासाठी त्याच्यासमोर आता ब्रिटेनच्या डॅनियेल बेथेल (Daniel Bethell) याचे आव्हान असेल. त्याला शह देत त्याने  नवा इतिहास रचण्याची संधी त्याला आहे.  

पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रत्येक सामन्यात सोडली छाप

गतवर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत एसएल३ प्रकारच्या खेळात नितेश कुमारनं रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यामुळे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याच्याकडून पदकाची आस होती. साखळी फेरीतील प्रत्येक सामन्यात दमदार खेळासह विजयी सिलसिला कायम राखत त्याने पदकाची दावेदारी भक्कम केली होती. बाद फेरीतील लढतीतही हा धडाका कायम ठेवत त्याने फायनल गाठली आहे. आता इथंही विजयातील सातत्य कायम राखून त्याने गो फॉर गोल्डसाठी जोर लावावा, अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा असेल. तोही याच इराद्याने कोर्टवर उतरल्याचे पाहायला मिळेल. 

अपघातात गमावला पाय, पण तरीही हरला नाही हिंमत  

शरीराच्या खालचा भाग गंभीररित्या अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंचा Sl 3 प्रकारात समावेश केला जातो. भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंडी (IIT Mandi) येथील पदवीधर आहे.२००९ मध्ये एका अपघातात त्याच्या पायाला कायमस्वरुपाची दुखापत झाली. पॅरा गेम्सच्या माध्यमातून  या पठ्यानं आयुष्यातील संघर्षावर मात करण्याचा मार्ग निवडला. पॅरालिम्पिक स्पर्धेतील फायनलसह तो आता यशाच्या शिखरावर पोहचला आहे.

गत पॅरालिम्पिकमध्ये प्रमोद भगतनं जिंकलं होतं सुवर्ण 

याआधी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत SL 3 प्रकारात प्रमोद भगत याने भारताला सुवर्ण क्षणाची अनुभूती दिली होती. पण यंदाच्या स्पर्धेआधी डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्यामुळे प्रमोद भगतवर बंदीची कारवाई झाली. हा भारतासाठी मोठा धक्का होता. पण नितीश कुमारनं या गटात पुन्हा एकदा सुवर्ण संधी निर्माण केली आहे.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाParisपॅरिसIndiaभारतBadmintonBadminton