शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तिरंदाज हरविंदर सिंगचे ऐतिहासिक सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 05:52 IST

Paris Paralympics 2024: तिरंदाज हरविंदर सिंग याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना पुरुष खुल्या रिकर्व्ह गटात सुवर्णपदक पटकावले. हरविंदरने सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावले असून तो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीयही ठरला आहे.

पॅरिस -  तिरंदाज हरविंदर सिंग याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना पुरुष खुल्या रिकर्व्ह गटात सुवर्णपदक पटकावले. हरविंदरने सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावले असून तो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीयही ठरला आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत हरविंदरने पोलंडच्या लुकास्झ सिस्झेक याचा ६-० असा फडशा पाडला. 

हरविंदरने याआधी उपांत्य फेरीत इराणच्या मोहम्मद रेझा अरब अमेरी याचे कडवे आव्हान ७-३ असे परतवले होते. ही लढत जिंकून हरविंदर पॅरालिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला भारतीय तिरंदाज बनला होता. अंतिम सामन्यात हरविंदरने धडाकेबाज खेळ करताना सुरुवातीपासून सामन्यावर घट्ट पकड मिळवली आणि लुकास्झ याला २८-२४, २८-२७, २९-२५ असे नमवले. विशेष म्हणजे हरविंदरने सलग पाच सामने जिंकत दिमाखात सुवर्ण पटकावले. रिकर्व्ह गटात प्रत्येक तिरंदाज ७० मीटर अंतरावरून नेम साधतात. 

 हरविंदर दीड वर्षाचा असताना त्याला डेंग्यू झाला होता. यावर उपचार सुरू असताना देण्यात आलेल्या इंजेक्शनने हरविंदरच्या पायांवर नकारात्मक परिणाम झाला. यामुळे त्याच्या पायांच्या हालचालींमध्ये अडचणी आल्या. हरविंदरने तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. पॅरालिम्पिकमध्ये तो पदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला होता.

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारत