शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
3
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
4
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
5
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
6
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
7
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
8
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
9
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
10
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
11
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
12
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
13
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
14
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
15
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
16
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
17
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
18
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
19
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
20
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकमधील शूर पदकविजेत्यांचा खूप अभिमान पण...; आनंद महिंद्रांनी व्यक्त केली खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 16:26 IST

anand mahindra news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने सहा पदके जिंकली.

paris olympics 2024 updates : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताने यावेळी एक पदक कमी जिंकले. याशिवाय यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एकाही शिलेदाराला सुवर्ण पदकाला गवसणी घालता आली नाही. अखेर एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले. लोकसंख्येच्या बाबतीत जगात अव्वल असणाऱ्या देशाने केवळ सहा पदके जिंकली. याचा दाखला देत अनेकांनी खदखद व्यक्त केली. अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

मला अर्थातच पॅरिस ऑलिम्पिकमधील आमच्या शूर पदकविजेत्यांचा खूप अभिमान आहे. पण पदकतालिकेतील आमची एकूण क्रमवारीतील घसरण पाहून मला दुःखाची कबुली द्यावीच लागेल. आपल्या क्षमतेनुसार जगण्यासाठी आणि आपल्या लोकसंख्येनुसार पदक मिळवण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल प्रत्येकजण विचार करत असतो. पण, माझे विचार संपले आहेत आणि मी गोंधळलो आहे. सरकारने खेळाडूंसाठी चांगला पैसाही खर्च केला. जिंकलेल्या खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून खूप प्रोत्साहन दिले गेले. क्रीडा पायाभूत सुविधांची गुणवत्ता सुधारते आहे, असे आनंद महिंद्रा यांनी सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपले मत मांडले. 

तसेच शाळांनी खेळावर अधिक भर दिला आहे. देशाची मानसिकता देखील बदलली आहे. सर्वांना आमच्या खेळाडूंमध्ये खूप रस आहे आणि आम्ही ते उत्साहाने साजरेही करतो आहे. मग पृथ्वीवर असे काय आहे, ज्यामुळे आपल्याला ऑलिम्पिक खेळांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप पाडता येत नाही? अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Anand Mahindraआनंद महिंद्राIndiaभारत