शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

स्वप्न भंगले! "आम्हाला भारतात रिकाम्या हाताने परतायचे नाही", सर्व खेळाडू भावुक, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 17:37 IST

india hockey olympics 2024 semi final : जर्मनीविरूद्धच्या पराभवामुळे भारतीय संघ सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला.

Paris Olympics 2024 : भारताचाहॉकी संघ तब्बल ४४ वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवेल या आशेने तमाम भारतीय सामना पाहत होते. पण, जर्मनीच्या संघाने भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करत अंतिम फेरी गाठली. पुन्हा एकदा भारतीय हॉकीचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. जर्मनीने उपांत्य फेरीत भारतीय संघाचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता कांस्य पदकाच्या लढतीत भारतीय संघाचा सामना स्पेनशी होणार आहे. भारतीय हॉकी संघाने शेवटच्या वेळी १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर ४१ वर्षांनंतर भारताला टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक मिळाले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. भारत उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत झाल्याने यावेळी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची लढत जर्मनी आणि नेदरलँड्स यांच्यात होईल. 

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ म्हणावी तशी कामगिरी करू शकला नाही. अखेरच्या ६ मिनिटांत भारताच्या हातून सामना निसटला आणि भारत सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला. ५४व्या मिनिटाला जर्मनीने गोल करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पराभव होतात भारतीय शिलेदार भावुक झाले. भारतीय हॉकी संघ तब्बल ४४ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचू शकला असता. भारतीय हॉकी संघाचा इतिहास सुवर्णमय राहिला आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारताने शेवटचे सुवर्ण पदक १९८० मध्ये जिंकले होते. यावेळी टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये ही आशा जागवली होती. मात्र उपांत्य फेरीतपर्यंतच टीम इंडियाला समाधान मानावे लागले. 

भारत कांस्य पदकासाठी खेळणार जर्मनीविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने सुरुवातीला गोल करून १-० अशी आघाडी घेतली होती. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने खाते उघडले होते. भारताचा विजयरथ कायम राहील असे अपेक्षित असताना जर्मनीने १८व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर २७व्या मिनिटाला गोल करत भारताने आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघ पुन्हा दडपणाखाली आला. संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारत अपयशी ठरला, त्यानंतर अखेर ५४व्या मिनिटाला जर्मनीने गोल करून भारताच्या आशा संपुष्टात आणल्या.

पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला की, सुवर्ण पदक जिंकण्याचे आमचे स्वप्न होते. पण आता ते भंगले आहे. आम्हाला भारतात रिकाम्या हाताने परतायचे नाही, त्यामुळे आम्ही कांस्य पदकाच्या सामन्यात आमचे सर्वोत्तम देऊ. भारतीय हॉकी संघ आता कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनशी खेळणार आहे. ३६ वर्षीय श्रीजेशचा हा शेवटचा सामना असेल. हा सामना जिंकून भारतीय खेळाडूंना श्रीजेशला अखेरचा निरोप द्यायचा आहे. ८ ऑगस्ट रोजी भारत आणि स्पेनचे संघ एकमेकांविरुद्ध कांस्य पदकासाठी सामना खेळणार आहेत. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४HockeyहॉकीIndiaभारतGermanyजर्मनी