शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Paris Olympics 2024 : भारताच्या दीपिकाची पदकाच्या दिशेने वाटचाल; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती लढतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 14:38 IST

दीपिका कुमारी तिच्या १६ व्या फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरली.

Paris Olympics 2024 Live Updates | पॅरिस : भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी १६ व्या राऊंडमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. महिलांच्या वैयक्तिक गटात दीपिकाचा सामना जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनशी झाला. पहिला सेट जिंकून या सामन्यात दीपिकाने ३-१ अशी आघाडी घेतली होती. पुन्हा मोठी आघाडी घेत दीपिकाने तिसरा सेटही जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये तिने २६-२५ असा विजय साकारला. अखेर दीपिकाने १६व्या फेरीत ६-४ असा विजय मिळवून पदकाच्या दिशेने कूच केली. या विजयासह दीपिका क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम आहे. 

आपल्या १९ महिन्यांच्या लेकीला भारतात ठेवून पॅरिसला गेलेली दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. दीपिका २०२२ मध्ये एका मुलीची आई झाली. ती अद्याप ऑलिम्पिकमधील तिच्या पहिल्या पदकाच्या शोधात आहे. मुलीपासून इतके दिवस लांब राहणे यामागे किती दु:ख लपले आहे हे शब्दांत मांडू शकत नाही. मी मागील अनेक वर्षांपासून ज्या पदकासाठी मेहनत करत आहे त्यासाठी हा त्याग आहे. मला मुलीची खूप आठवण येते, पण त्याला पर्यायही नाही, असे दीपिका सांगते. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत