शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

Paris Olympic 2024 : भारताची Manu Bhaker फायनलमध्ये! २० वर्षांनंतर घडला इतिहास, देशाला पदकाची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 17:43 IST

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरुवात झाली आहे.

Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली आहे. भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता ती अंतिम फेरीत खेळेल. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत मनू भारतासाठी पदक जिंकेल अशी आशा आहे.

मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. सातत्य दाखवत तिने नेमबाजी करताना तिसरे स्थान पटकावण्यात यश मिळवले. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र होतात. मनूला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले मात्र, भारताची दुसरी नेमबाज रिदम संगवानच्या पदरी निराशा पडली अन् तिला १५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

भारताला पदकाची आशा

मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.

दरम्यान, भारताच्या मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ती ५८० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. रविवारी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता मनू भाकरचे पदकासाठी लढेल. तर भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान ५७३ गुणांसह १५व्या स्थानी राहिली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत