शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lakshya Sen, Paris Olympics 2024: सेन वर भारी पडला एक्सलसेन, पण अजूनही भारताचे पदकावर 'लक्ष्य'; मिळू शकतं मेडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 17:08 IST

Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: सुरुवातीला आघाडी घेऊनही लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला.

Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: भारताच्या लक्ष्य सेनला आज पुरुष एकेरीत उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने पराभूत केले. लक्ष्यने संपूर्ण सामन्यात चमकदार खेळ केला, परंतु छोट्या चुका त्याला महागात पडल्या. त्यामुळेच एक्सेलसेनने २२-२०, २१-१४ अशा दोन सरळ गेममध्ये सामना जिंकला. लक्ष्य सेन पराभूत झाला असला तरी त्याला अजूनही पदक मिळवता येऊ शकते. उद्या कांस्यपदकासाठी लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे.

पहिल्या गेममध्ये आघाडीवरून पिछाडी

सेमीफायनलच्या पहिल्या गेमच्या सुरुवातीला लक्ष्य सेनने व्हिक्टर एक्सलसेनवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. एकेकाळी लक्ष्य आणि व्हिक्टर दोघेही बरोबरीत होते, पण काही वेळातच लक्ष्यने व्हिक्टरवर आघाडी घेतली. लक्ष्यने ११ गुण मिळवले तेव्हा व्हिक्टर केवळ ९ गुणांवर होता. लक्ष्य त्यानंतर १८ गुणांपर्यंत पोहोचला. नंतर लक्ष्य काहीचा अडचणीत असल्याचे दिसले आणि व्हिक्टरला आघाडी घेण्याची संधी मिळाली. व्हिक्टरने जोरदार पुनरागमन करत पहिला गेम २२-२० असा जिंकला.

व्हिक्टरविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर, लक्ष्य सेनने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. लक्ष्यने पहिल्या काही मिनिटांत व्हिक्टरवर ७-० अशी आघाडी घेतली होती. लक्ष्यने ७ गुण मिळवले तेव्हा व्हिक्टरने पहिला गुण मिळवला. पण काही वेळातच सामना पालटला. व्हिक्टर झटपट ८-७ असा पुढे आला. त्यानंतर लक्ष्यने निश्चितच आघाडी घेतली, मात्र व्हिक्टरने पुन्हा स्कोअर १२-१२ असा आणला. त्यानंतर हळूहळू विक्टरने आपली वादळी खेळी सुरु केली आणि २१-१४ असा दुसरा गेमही जिंकला. दुसऱ्या गेम सोबतच विक्टर सलग आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक बॅडमिंटन फायनलमध्ये पोहोचला. गेल्या ऑलिम्पिकमध्ये विक्टरने या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

आता लक्ष्य सेन कांस्यपदकासाठी उद्या मलेशियाच्या खेळाडूशी भिडणार आहे.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४BadmintonBadmintonIndiaभारत