शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

Paris Olympics 2024: हॉकी सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव; जर्मनीची फायनलमध्ये धडक, आता 'कांस्य'साठी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 00:31 IST

भारतीय हॉकी टीमला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या रोमहर्षक लढतीत जर्मनीने ३-२ असा विजय मिळवला आहे.

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये निराशाजनक पराभव झालेला आहे. भारताला हरवून जर्मनीनं फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला हरवून कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे आजच्या सेमीफायनल सामन्यावर अनेकांचं लक्ष होतं. भारतीय संघ गोल्ड मेडलच्या लढतीसाठी पात्र ठरू शकला नसला तरी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाला कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल.

पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय टीमनं जर्मनीविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती. भारतानं पहिल्या क्वार्टरमध्ये ७ पॅनल्टी कॉर्नर मिळवले त्यात १ गोल मारण्यात आला. भारतासाठी हरमनप्रीत सिंगनं पॅनल्टी कॉर्नरमध्ये कुठलीही घाई न करता भारताला आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीतचा हा पॅरिस ऑलिम्पिकमधील आठवा गोल होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मिळालेल्या पॅनल्टी कॉर्नरमध्ये भारताविरोधात जर्मनीनं १-१ बरोबरी केली. १८ व्या मिनिटाला गोंजालो पिलाटनं जर्मनीसाठी गोल मिळवून दिला. 

त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येच जर्मनीच्या क्रिस्टोफर रुएहरनं २७ व्या मिनिटाला पॅनल्टी स्ट्रोकवर शानदार गोल मारला आणि जर्मनीला २-१ ने आघाडी घेऊन गेली. भारत आणि जर्मनी यांच्यातील सेमीफायनलमध्ये दुसरा क्वार्टर संपला तेव्हा जर्मनीनं भारताविरोधात २-१ ने आघाडी घेतली होती. त्यानतंर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताकडून सुखजीत सिंगने ३६ व्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरवर गोल मारून २-२ अशी बरोबरी केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या परंतु केवळ एकच गोल यशस्वी झाला. 

चौथ्या क्वार्टरची सुरुवात होताच जर्मनीला पॅनल्टी कॉर्नर मिळाला मात्र भारतीय गोलकिपर पीआर श्रीजेशनं जबरदस्त कामगिरी करत गोल रोखला. त्याशिवाय भारतीय डिफेंडर संजयनेही जर्मनीच्या प्रयत्नांना अयशस्वी ठरवलं. त्यानंतर अखेरच्या १५ मिनिटांत जर्मनीनं त्यांचा खेळ आक्रमक केला. चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं १ गोल यशस्वी केला. ५४ व्या मिनिटांवर जर्मनीच्या मार्को मिल्टकाऊनं गोल केला. त्यामुळे जर्मनीला भारताविरोधात ३-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर भारतीय टीमनं गोलकिपर पीआर श्रीजेशला मैदानाबाहेर पाठवत राखीव खेळाडूला मॅचमध्ये खेळायला आणले.  मात्र अखेरच्या क्षणी जर्मनीनं विजय मिळवला आहे. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४HockeyहॉकीGermanyजर्मनी