शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

Paris Olympics 2024 : भारत जिंकला अन् हरलाही! सेननं 'लक्ष्य' गाठलं; मराठमोळ्या स्वप्नीलनं पदक जिंकलं पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 19:53 IST

Paris Olympics 2024 Updates In Marathi : कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने फायनलपर्यंत मजल मारली अन् इतिहास रचला.

Paris Olympics 2024 Day 6 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील आज गुरुवारचा दिवस भारतासाठी चढ-उताराचा राहिला. दिवसाच्या सुरुवातीला भारतीय खेळाडूंना २० किमी चालण्याच्या स्पर्धेत अपयश आले. तीनपैकी एकही खेळाडू पहिल्या २५ मध्येही आला नाही. त्यानंतर मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने मात्र तमाम भारतीयांना खुशखबर देत कांस्य पदक जिंकले. त्याने ५० मीटर एअर रायफल प्रकारात ४५१.४ गुणांची कमाई केली अन् पदक पटकावले. पण, बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा मलेशियाकडून पराभव झाला. चिराग आणि सात्विकने भारताकडून चांगली कामगिरी केली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. मलेशियाने हा सामना १-२ असा जिंकला. बॉक्सिंगमध्ये निखत जरीनला पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताच्या पदकाची आशा मावळली. 

बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय या दोन भारतीय शिलेदारांचा सामना झाला. अपेक्षेप्रमाणे लक्ष्यने सहज विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये प्रणॉयचा २१-१२ असा पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या गेममध्ये २१-६ ने विजय नोंदवला. लक्ष्यने आपल्या सहकाऱ्याचाच पराभव केल्याने भारत जिंकला आणि हरलाही असे पाहायला मिळाले. तिरंदाजीत भारताला निराशेचा सामना करावा लागला. तसेच मराठमोळा तिरंदाज खेळाडू प्रवीण जाधवला पुढील फेरी गाठता आली नाही. मूळचा सातारचा असलेल्या प्रवीणला ०-६ ने पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, आज भारताला स्वप्नीलच्या रूपात पदक मिळाले असले तरी पदक अपेक्षांना मोठा धक्का बसला. पदकाचे दावेदार असलेल्या तीन प्रकारात भारतीय शिलेदारांना पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागची जोडी पराभूत झाली. बॉक्सिंगमध्ये निखतला वर्ल्ड चॅम्पियन मलेशियन जोडीने नमवले. तसेच नेमबाजीतील महिलांच्या ५० मी थ्री पोझिशनमध्ये सिफ्ट कौर आणि अंजुम मोदगील यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. भारताच्या हॉकी संघाचा विजयरथ रोखण्यात बेल्जियमला यश आले. बेल्जियमने टीम इंडियाचा १-२ असा पराभव केला. बेल्जियम विजयासह अव्वल स्थानी गेला तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने न्यूझीलंड आणि आयर्लंडचा पराभव केला आहे. तर अर्जेंटिनाविरूद्धचा सामना अनिर्णित संपला.   

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारतboxingबॉक्सिंगBadmintonBadminton