शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Paris Olympic 2024 : सरकारने मनूच्या प्रशिक्षणासाठी २ कोटी खर्च केले; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:22 IST

भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले.

manu bhaker news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले. तिच्या या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यंदाच्या ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा झाला. नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. यांसह, ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. अंतिम फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले. जिन ओह आणि येजी किम या दक्षिण कोरियन नेमबाजांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले.

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मनू भाकरचे कौतुक करताना विविध बाबींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्य पदक जिंकून भारताचा गौरव केला आहे. ती 'खेलो इंडिया'चा एक भाग आहे. पंतप्रधान मोदींनी 'खेलो इंडिया'ला सुरुवात केली हे सांगताना मला आनंद होत आहे. त्यांच्या या उपक्रमांतर्गत देशात क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. तसेच खेळाडूंना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची खात्री करण्यासाठी TOPS योजनेअंतर्गत माहिती घेण्यात आली. क्रीडा मंत्री ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

मनूच्या प्रशिक्षणासाठी २ कोटींचा खर्च मनसुख मांडविया पुढे म्हणाले की, मनू भाकरवर सुमारे २ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तिला जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. इतर खेळाडूही ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करतील असा विश्वास आहे. मनूच्या प्रशिक्षणासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. तिने जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षण घेतले. सरकारतर्फे आर्थिक सहाय्य प्रदान केले गेले, जे तिला हवे असलेले प्रशिक्षक भाड्याने देण्यासाठी आवश्यक होते.  

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार